देश

MP Election: मतदान करा, पोहे-जिलेबी खा; वाचा काय आहे 'ही' भन्नाट स्किम!

सकाळ डिजिटल टीम

MP Election: मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु असताना इंदूरच्या व्यापारी वर्गान देखील पुढाकार घेतला आहे. आगामी विधानसभेत सकाळी लवकर मतदान करणाऱ्या मतदारांना मोफत पोहे आणि जिलेखी देण्याची अनोखी ऑफर येथील प्रसिद्ध फुड ५६ दुकाने आणली आहे.

२३० सदस्य संख्या असलेल्या मध्य प्रदेशच्या विधानसभेची निवडणूक येत्या १७ नोव्हेंबरला होत आहे. शहरातील कोणत्याही मतदाराने सकाळच्या वेळी लवकर मतदानाचा हक्क बजावला आणि संबंधितांनी मतदानाची खूण दाखविल्यास मोफत पोहे आणि जिलेबी देण्यात येईल, असे आज जाहीर करण्यात आले.

५६ दुकान व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गुंजन शर्मा म्हणाले, इंदर शहराने स्वच्छेत देशात आघाडी घेत नावलौकिक कमावला आहे. त्यामुळे मतदानातही इंदूर विधानसभा मतदारसंघाने बाजी मारावी यासाठी व्यापारी संघटनेने मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

ही योजना मतदानाच्या दिवशी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंतच लागू असेल, असेही स्यांनी नमूद केले. मोफत नाश्त्याची वेळ होऊन गेल्यानंतर येणान्या मतदारांसाठी पोहा आणि जिलेबीच्या बिलावर विशेष दहा टक्के सवलत दिली जाईल. ही सवलत दिवसभर असेल, असे सांगितले.

५६ दुकान येथील खाद्यपदार्थ प्रसिद्ध असून येथील जिलेबी आणि पोद्याना आस्वाद घेण्यासाठी इंदूरला भेट देणारे पर्यटक आवर्जुन येतात. भारत अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) ने '५६ दुकान ला क्लिन स्ट्रिट फूड चा दर्जा दिला आहे. कारण या ठिकाणच्या व्यावसायिकांनी स्वच्छतेचे निकष पूर्ण केले आहेत.

२०१८ मध्ये इंदर विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या १४.७२ लाख होती आणि ६७ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता.. इंदूर शहरातगत पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यावेळी १५.५५ लाख मतदार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT