MP imran pratapgarhi video recited a poem on Manipur violence in the Parliament premises monsoon Session  
देश

Imran Pratapgarhi Video : "मैं मणिपुर हूँ मेरी सदायें सुनो"; संसदेच्या आवारात प्रतापगडींनी कवितेतून मांडली मणिपूरची व्यथा

रोहित कणसे

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात होरपळत असलेल्या मणिपूरमधील परिस्थितीवर संसदेत व्हावी यासाठी विरोधक आक्रमख भूमिका घेताना दिसत आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहात या मुद्द्यावर प्रचंड गदारोळ झाल्याचं पाहायला मिळाल. यादरम्यान राज्यसभेचे आपचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनी सादर केलेली एक कविता सध्या चर्चेत आहे.

मणिपूर प्रकरणावरून राज्यसभेच्या विरोधी पक्षातील खासदारांनी काल रात्रीपासून संसद भवनातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केल आहे. या आंदोलनात राज्यसभेचे विरोधी पक्षातील अनेक खासदार सहभागी झाले आहेत. दरम्यान यावेळी राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनी "मैं मणिपुर हूँ मेरी सदायें सुनो" अशा आशयाची कविता सादर केली.

राज्यसभेचे आपचे खासदार संजय सिंह यांच्या विरोधात केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात देखील हे खासदार आंदोलन करत आहेत. रात्रीपासूनच हे आंदोलन सुरू आहे.

खासदार इम्रान प्रतापगडी यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून या कवितेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये खासदार प्रतापगडी हे रात्रीच्या अंधारात खासदारांसोबत बसून त्यांची कविता गाताना दिसत आहेत. कवितेचे बोल पुढील प्रमाणे...

मेरी साँसो पे पहरा भला किसलिए

रूह पर ज़ख़्म गहरा भला किसलिए

मेरे लोगों के घर, जान और माल का

मोल कुछ भी न ठहरा भला किसलिए

सर पटकने गली किसकी जाएँ,सुनो

मैं मणिपुर हूँ मेरी सदायें सुनो।

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये संसदेच्या बाहेर आणि आत संघर्ष सुरू आहे. त्यामुळे सभापतींना संसदेचे कामकाज सलग तिसऱ्या दिवशी तहकूब करावे लागले. 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' (इंडिया) विरोधी आघाडीने सोमवारी रात्रभर संसदेच्या आवारात आंदोलन सुरूच ठेवले.

काही दिवसांपूर्वी मणिपूरमधील हिंसाचारादरम्यान दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यानंतर देशभरातून संतापाची लाट उमटली, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपुर हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी मागणी विरोधी पक्षातील नेते करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT