भोपाळ- पाज राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या घोषणा झाल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहेत, तर ३ डिसेंबरला निकाल लागेल. त्यावेळी जनतेने कोणाला कौल दिला हे स्पष्ट होईलच, पण त्याआधी निवडणुकांच्या घोषणा झाल्यानंतर एक ताजा सर्व्हे करण्यात आला आहे. इंडिया टिव्ही-सीएनएक्स ने हा ओपिनियन पोल घेतला आहे. (madhya assembly polls election survey )
राज्यातील निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. मध्य प्रदेशात भाजपला पुन्हा एकदा सत्तेमध्ये यायचं आहे, तर काँग्रेस यावेळी राज्यात बदल होईल असा दावा करत आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने प्रचार सभांचा धडाका सुरु झाला आहे. सर्व्हेमध्ये दावा करण्यात आलाय की, यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये 'कांटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे.
मध्य प्रदेशमध्ये जनता कोणाला पसंती देणार याबाबत उत्सुकता आहे. सर्व्हेनुसार, काँग्रेस आणि भाजपच्या जागांमध्ये जास्त अंतर नाहीये. मध्य प्रदेश विधानसभेच्या एकूण २३० जागा आहेत. यापैकी ११५ जागांवर भाजप विजय होईल, तर काँग्रेसच्या पदरात ११० जागा पडणार असल्याचं सर्व्हेमध्ये सांगण्यात आलंय. इतर पक्षांना एक ते पाच जागा मिळू शकतात.
सर्व्हेनुसार स्पष्ट दिसतंय, की भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई होणार आहे. २०१८ मधील निवडणुकीमध्येही अशाच प्रकारची स्थिती होती. भाजप आणि काँग्रेसमध्ये फक्त ८ जागांचा फरक होता. त्यामुळे पुन्हा एकदा अशाच प्रकारची स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
इंडिया टिव्ही-सीएनएक्सच्या ओपिनियन पोलमध्ये लोकांना बेरोजगारी, विकास, महागाई यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा कोणता? असा प्रश्न करण्यात आला होता. यात २७ टक्के लोकांनी म्हटलं की, बेरोजगारी त्यांच्यासाठी मोठा मुद्दा आहे. २१ टक्के लोकांनी विकास आणि १९ टक्के लोकांनी महागाई महत्त्वाचा मुद्दा असल्याचं म्हटलं.
मध्य प्रदेशातील ७ टक्के जनतेने भ्रष्टाचार हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं म्हटलं आहे. ५ टक्के लोकांनी कायदा आणि सुव्यवस्थेला महत्व दिलं आहे. ३ टक्के लोकांनी काही सांगता येणार नाही असं उत्तर दिलंय. दरम्यान, पाच राज्यांचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. याकडे सर्व देशाचं लक्ष असेल. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.