MP Sanjay Raut critisised pm Narendra Modi on loksabha election Rajya Sabha  Esakal
देश

Sanjay Raut: 'देशाने नरेंद्र मोदींना बहुमत मुक्त केले', खासदार राऊत यांचा राज्यसभेत टोला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला काँग्रेस मुक्त करण्याची घोषणा केली होती. परंतु देशातील मतदारांना पंतप्रधान मोदी यांना बहुमत मुक्त केले, असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील सरकार बहुमताचे नसून अल्पमताचे सरकार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपतींनी बहुमताचे सरकार असल्याचे वक्तव्य चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Also read:ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात वारजे, ता. २३ ः येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघाच्या ‘मनोगत’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘सकाळ’चे उपसंपादक व विनोदी लेखक सु. ल. खुटवड होते. ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते. यावेळी खुटवड यांनी आयुष्यात विनोदाचे महत्त्व विविध उदाहरणे देत व किस्स्यांद्वारे सांगितले. हशा आणि टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी त्यांना दाद दिली. चांदगुडे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. ‘मनोगत’मधील चांगल्या पैलूवर त्यांनी प्रकाश टाकला. विवाहास पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष गोपाळराव कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. ‘मनोगत’च्या संपादिका स्वाती वर्तक यांनी अंकामागील भूमिका सांगितली. संध्या बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत ठुसे यांनी आभार मानले. फोटो ः २०१८१

खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपती मूर्मू यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना राष्ट्रपतींनी दही भरविले होते. या संदर्भातील खासदार राऊत यांनी केलेला उल्लेख तालिका सभापती घनश्याम तिवारी यांनी कामकाजातून काढून टाकला. खासदार राऊत यांना तीन मिनिटांचा अवधी दिल्यानंतर त्यांचा माईक बंद करण्यात आला. विरोधकांचे आवाज आपण बंद करीत असल्याने संविधान धोक्यात आल्याचा आरोप होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT