MP Shrinivas Patil esakal
देश

Lumpy Vaccine : 'लम्पी'च्या लसीसाठी खासदार श्रीनिवास पाटलांचं थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र

राज्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

कऱ्हाड (सातारा) : लम्पी आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळं सर्व जनावरांना लसीकरणासाठी आवश्यक ती लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला (Parshottam Rupala) यांच्याकडं केली होती. दरम्यान, केंद्रीय मंत्री रूपाला यांनी संबंधित लस उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असं आश्वासन पत्राव्दारे खासदार पाटील यांना दिलं आहे.

लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा वाघेरी येथील जनावरांना प्रादुर्भाव झाला. त्यानंतर फलटण आणि सातारा तालुक्यांतील जनावरांना लागण झाली. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या भागात प्रादुर्भाव झाला आहे, त्या गावांसह परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव विशेषतः खिलार जनावरांना होत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने उपचार करण्यापेक्षा आजार येऊच नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे सूचित करण्यात आलं आहे.

सध्या बाधित जनावरे आणि त्या परिसरातील पाच किलोमीटर अंतरातील जनावरे यांनाच लसीकरण करण्यात येत आहे. सरसकट सर्वच जनावरांचे लसीकरण केले जात नाही. मात्र, सर्वच जनावरांना लसीकरण केल्यास त्याचा प्रादुर्भाव कमी होईल. यासाठी केंद्र शासनाने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार पाटील यांनी केंद्रीय मंत्री रूपाला यांच्याकडे पत्राव्दारे केली होती. त्यासंदर्भात विचारविनिमय करून मंत्री रूपाला यांनी जनावरांना लस उपलब्ध करून देण्यासंदर्भातील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन खासदार पाटील यांना दिले आहे. त्यामुळे आता केंद्राकडून लस उपलब्ध होऊन सर्वच जनावरांना लसीकरण करणे शक्य होणार असल्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT