सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन समाज म्हणून मराठा समाजाची ओळख आहे.
सातारा : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता द्यावे. यासोबतच धनगर समाजाच्या मागणीनुसार त्यांचे आरक्षण बदलून द्यावे, अशी आग्रही मागणी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे केली. या प्रश्नावर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.
दिल्लीत महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. या बैठकीनंतर खासदार उदयनराजे भोसले व रणजितसिंह नाईक- निंबाळकर मराठा व धनगर आरक्षण प्रश्नाबाबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील आरक्षण प्रश्नावर दोन्ही खासदारांनी श्री. मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही भूमिका दोन्ही खासदारांनी मांडली. महाराष्ट्रातील मराठा समाजाने देशासाठी बलिदान दिले आहे.
सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन समाज म्हणून मराठा समाजाची ओळख आहे. मात्र, या समाजातील मुलामुलींची व कुटुंबांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. शिक्षणाची फी भरणे, ही अवघड झाले आहे. तसेच शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीची शाश्वती नाही. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.
यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती दोन्ही खासदारांनी केली. मराठा आरक्षण विषय दिवसेंदिवस फारच गुंतागुंतीचा आणि गंभीर होत चालला आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर विशेष लक्ष घालून हा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
धनगर समाजाला अनुसूचित जातीमधून आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी हा समाज अनेक वर्षे झटत आहे. इतर राज्यात धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे. मात्र, महाराष्ट्रात धनगड शब्द नसल्याने अनुसूचित जातीमधून आरक्षण मिळत नाही. तरी आपण यामध्ये लक्ष घालावे व समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणीही या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे केली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही विषयांवर सकारात्मक विचार केला जाईल व लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.