Mpox  sakal
देश

Mpox: भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, पण...; सरकारने स्पष्ट केली परिस्थिती

संतोष कानडे

नवी दिल्लीः भारतामध्ये एक मंकीपॉक्सची रुग्ण आढळून आलेला आहे. सरकारने याबाबत भीतीचं कारण नसल्याचं म्हटलं असून हा रुग्ण विलगिकरणात होता, असं सांगितलं आहे. त्यामुळे या रुग्णापासून संसर्ग वाढणार असल्याची खात्री सरकारने दिली आहे.

भारतात एमपॉक्स (मंकीपॉक्स)चा पहिलाच संशयित रुग्ण आढळल्याची माहिती रविवारी समोर आली होती. मंकीपॉक्स संक्रमणाच्या केसेस आढळत असलेल्या देशातून नुकतेच प्रवास केलेला एक तरुण हा मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण म्हणून डिटेक्ट झाला होता. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबद्दल माहिती दिली होती. या रुग्णाला रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

एमपॉक्सशी लढा देत असलेल्या देशातून परतलेल्या या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. डब्लूएचओने एमपॉक्सला ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी घोषित केले असून सध्या अनेक देशांमध्ये याची असंख्य प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात देखील अनेक दिवसांपासून प्रशासनाकडून याबद्दल खबरदारी घेतली जात आहे. मात्र भारतात तशी परिस्थिती नाही, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

आढळून आलेल्या रुग्णामध्ये पश्चिम आफ्रिकन क्लेड 2 हा एमपॉक्सचा विषाणू सापडला आहे. हे एक वेगळे प्रकरण असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पूर्वीही अशी 30 प्रकरण पुढे आलेली आहेत. सध्या डब्ल्यूएचओने जाहीर केलेली आणीबाणी क्लेड 1 शी संबंधित आहे, असंही सरकारने म्हटलंय.

एमपॉक्सचे काही दिवसांपासून अनेक देशांमध्ये रुग्ण आढळत आहेत. ज्यानंतर जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. जगातील ११६ देशांमध्ये एमपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. २०२२ मध्ये देखील डब्लूएचओने याबद्दल इमर्जन्सी जाहीर केली होती. या व्हायरसमुळे काँगेमध्ये आतापर्यंत ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १८ हजारांहून अधिक प्रकरणे या वर्षभरात समोर आले आहेत. यासोबतच पाकिस्तानात देखील नुकतेच एमपॉक्सच्या रुग्णांच्या संख्येत वाढ पाहायल मिळाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: "जिंदगीभर असंच सुरु राहील का?", शेतकऱ्यानं तहसील कार्यालयाचं गेट बंद करुन बांधले बैल नंतर जे घडलं ते...

Prarthana Behere : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आता ‘कास्टिंगवाइब’वर

India vs Bangladesh Toss Update: बांगलादेशने टॉस जिंकून घेतला बॉलिंगचा निर्णय; भारताकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा

Train Accident: उत्तर भारतात रेल्वे मालगाडीला दोन ठिकाणी अपघात; दिल्लीकडे जाणाऱ्या 15 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

Latest Marathi News Updates : स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री शिंदे झाले सहभागी, गिरगाव चौपाटीवर केली स्वच्छता

SCROLL FOR NEXT