MS Dhoni Bhuvan Bam among top celebrities violating advertising rules says ASCI check list  
देश

धोनी, भुवन बाम जाहिरातींचे नियम मोडणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये अव्वल! ASCI जाहीर केली संपूर्ण यादी

सकाळ डिजिटल टीम

विविध क्षेत्रातील अनेक बड्या सेलिब्रिटींकडून जाहिरातीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सेलिब्रिटींमध्ये क्रिकेटर एमएस धोनी हा पहिल्या क्रमांकावर असून युट्यूबर भुवन बामचा दुसरा क्रमांक आहे.

या दोघांसह अनेक इतरही अनेक सेलिब्रिटी जाहिरात नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्यचे अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) च्या ताज्या अहवालात म्हटले आहे. अशा पध्दतीने जाहिरातींचे नियम मोडणाऱ्या सेलिब्रिटींची नावे ASCI ने आपल्या रिपोर्टमध्ये जारी केली आहेत.

ASCI ने 2022-23 साठी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये त्यांनी 7,928 जाहिरातींचे विश्लेषण केले आहे. या अहवालात अशा अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत, ज्यांनी इन्फ्लुअन्सर म्हणून एएससीआयच्या नियमांचे उल्लंघन केले. तसेच जाहिरातीपूर्वी या सेलिब्रिटींनी त्यांच्या वतीने कंपनी किंवा उत्पादनाची सखोल चौकशी केली नसल्याचा देखील आरोप आहे.

FY23 मध्ये सेलिब्रिटींविरुद्धच्या तक्रारींमध्ये 803% वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 22 मध्ये केवळ 55 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, यावेळी हा आकडा वाढून 503 जाहिरातींवर पोहोचला आहे.

इंस्टाग्रामवर जाहिरात नियमांचे सर्वाधिक उल्लंघन होते ज्याचे प्रमाण 33% होते. त्याच वेळी, 31% नियम मोडणाऱ्या जाहिराती फेसबुकच्या होत्या. तर 22% वेबसाइटवरून, 12% या YouTube आणि 2% इतर स्त्रोतांकडून दाखवण्यात आल्या. पर्सनल केअरच्या सर्वाधिक 35.56% जाहिरातींनी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्याच वेळी, यानंतर, खाद्य आणि पेय श्रेणीतील 14.57% जाहिरातींनी नियमांचे उल्लंघन केले.

या यादीत कोणाचा समावेश आहे?

या यादीत पहिले नाव येते ते महेंद्रसिंग धोनीचे. त्यानंतर भुवन बाम, जिम सरभ, विराट कोहली, विशाल मल्होत्रा, श्रद्धा कपूर, रणवीर सिंग, सारा अली खान, राहुल देव, क्रिती सेनन, मनोज तिवारी, काजल अग्रवाल यांसारख्या बड्या हस्तींच्या नावांचाही यात समावेश आहे.

ASCI काय आहे आणि त्यांचा अहवाल काय सांगतो?

तर 1985 मध्ये स्थापन करण्यात आलेली अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) ही देशाच्या जाहिरात उद्योगासंबंधीत सेल्फ रेग्युलेटरी बॉडी आहे. जी दिशाभूल करणाऱ्या, चुकीच्या, हानिकारक जाहिरातींवर रिपोर्ट जारी करते. ASCI ला 2022-23 करिता 8,951 तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी 7,928 तक्रारींवर त्यांनी कारवाई केली. या 7,928 पैकी 97% जाहिराती अशा होत्या ज्यात सुधारणा आवश्यक होती.

यातील 75% जाहिराती डिजिटल माध्यमांच्या होत्या. यानंतर 21% जाहिराती छापण्यात आलेल्या होत्या. तसेच प्लॅटफफॉर्मचा विचार करता इंस्टाग्रामवर जाहिरात नियमांचे सर्वाधिक उल्लंघन होते. ज्याचे प्रमाण 33% होते.

त्याच वेळी, 31% नियम मोडणाऱ्या जाहिराती या फेसबुकच्या होत्या. तर 22% वेबसाइटवरून, 12% या YouTube आणि 2% इतर स्त्रोतांकडून दाखवण्यात आल्या. पर्सनल केअरच्या सर्वाधिक 35.56% जाहिरातींनी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्याच वेळी, यानंतर, खाद्य आणि पेय श्रेणीतील 14.57% जाहिरातींनी नियमांचे उल्लंघन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT