MUDA Case Karnataka Chief Minister Siddaramaiah esakal
देश

'कर्नाटकातील काँग्रेस सरकार BJP कडून पाडण्याचा प्रयत्न'; Operation Lotus बाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

सकाळ डिजिटल टीम

''येडियुराप्पांना माझा राजीनामा मागण्याची नैतिकता आहे का? आता ते पोक्सो प्रकरणात अडकले आहेत. न्यायालयाच्या कृपेने ते तुरुंगात न जाता बाहेर आहेत.''

बंगळूर : भाजप-धजदने आपल्याला टार्गेट करून आमचे काँग्रेस सरकार (Congress Government) अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते यशस्वी होणार नाहीत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) म्हणाले. म्हैसूरमध्ये जनतादर्शन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘सिद्धरामय्या गरीबांसाठी काम करत आहेत. यासाठीच पंचहमी योजना राबवल्या आहेत. भाजप-धजदला हे सहन होत नाही. त्यासाठी ते माझे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजप-धजदचा पंचहमी योजनांना सुरुवातीपासूनच विरोध होता. पंतप्रधान मोदीही (PM Modi) पंचहमी योजनांच्या विरोधात बोलत होते. वर्षापासून पंचहमी योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. हे सहन न झाल्याने त्यांनी माझ्या सरकारला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप (BJP) -धजदच्या खोट्या गोष्टींवर लोकांचा विश्वास नाही. खोटे बोलल्याने यश मिळत नाही.’’

यापूर्वी त्यांनी ऑपरेशन कमळ (Operation Lotus) करून माझे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. आता त्यांनी माझ्यावर निशाणा साधून सरकारला पाडण्यासाठी खोटे आरोप करत आहे. भाजप-धजद तुम्हाला पाहून घाबरतात का, या प्रश्नाला उत्तर देताना, सत्याचा नेहमीच विजय होतो, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. ‘मुडा’ प्रकरणाबाबत राज्यपालांकडून एकच नोटीस मिळाली आहे. ज्याला मी उत्तर दिले आहे. ‘मुडा’ घोटाळ्यात माझी कोणतीही भूमिका नाही. कायद्यानुसार सर्व काही ठीक आहे. राज्यपाल हे राज्यघटनेचे प्रमुख असतात. त्यामुळे राज्यघटनेनुसार, कायद्यानुसार ते काम करतील, असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.

बदली भूखंड मंजुरीत हात नाही

ते म्हणाले, २०१४ मध्ये मुख्यमंत्री असताना आमची जमीन बेकायदेशीरपणे बळकावल्याबद्दल बदली भूखंड देण्यात यावा, असा अर्ज माझ्या पत्नीने ‘मुडा’ यांना दिला होता. त्यानंतर ‘मुडा’ अधिकाऱ्यांनी ही बाब माझ्या निदर्शनास आणून दिली असता मी मुख्यमंत्री असेपर्यंत एक गुंठाही जागाही देऊ नका, असे सुचवले होते. मी सत्तेतून पायउतार झाल्यानंतर पत्नीने २०२१ मध्ये पुन्हा भूखंड देण्यासाठी अर्ज केला होता. कायद्यानुसार तत्कालीन भाजप सरकारने बदलीच्या जागेला मंजुरी दिली होती. यात माझी भूमिका काय आहे? मी कोणतेही पत्र किंवा आदेश दिले होते का, असा सवाल त्यांनी केला.

येडियुराप्पांनी राजकीय संन्यास घ्यावा

ते म्हणाले, येडियुराप्पांना माझा राजीनामा मागण्याची नैतिकता आहे का? आता ते पोक्सो प्रकरणात अडकले आहेत. न्यायालयाच्या कृपेने ते तुरुंगात न जाता बाहेर आहेत. ते ८२ वर्षांचे आहेत. त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी. येडियुरप्पा आपली कोणती नैतिकता राखून राजीनामा मागत आहेत. त्यांच्यावर १८-२० गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी ते मुख्यमंत्री असताना त्यांनी पैसे घेऊन डिनोटिफिकेशन केले होते. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास राज्यपालांनी परवानगी दिली होती.

येडियुराप्पांनीच निवृत्ती घ्यावी

मी कोणत्याही पत्रावर सही केलेली नाही. माझे प्रकरण वेगळे. येडियुरप्पांचे प्रकरण वेगळे आहे. येडियुराप्पा यांनी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेणे चांगले आहे. त्याच्या काळातील घोटाळा दाखवू त्यासाठीच आज पत्रकार परिषद बोलावावी, असे वाटले. शुक्रवारी म्हैसूरमध्ये काँग्रेसचा मेळावा आहे. तुम्हाला तिथे सगळे सांगेन, असे सिद्धरामय्या म्हणाले.

कुमारस्वामींचे घोटाळेही बाहेर काढू

माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा जंत्कल खाण घोटाळा, भाजपचा प्रशासन घोटाळा, भोवी निगम घोटाळा, देवराज अर्स ट्रक टर्मिनल घोटाळा या सर्व घोटाळ्यांचा भांडोफोड करणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobikwik IPO: मोबिक्विकला ७०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीची मान्यता

Mumbai Metro 3: मुंबईतल्या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण; थांबे, तिकीट अन् मार्ग.. जाणून घ्या सर्वकाही

Kannad Crime : फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थीं-विद्यार्थींनींना सहा गुंडाकडून रस्त्यावर दगडी फरशीने मारहाण; रिक्षा चालक आरोपी ताब्यात, पाच जण फरार

Warning Pune: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं फुल्ल; नदीपात्रात होणार विसर्ग

Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरण; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या समोर होणार आरोपींची ओळख परेड

SCROLL FOR NEXT