Mughal History esakal
देश

Mughal History : सर्वशक्तिमान सैन्य असताना देखील मुघलांना नेपाळ का जिंकता आला नाही?

सर्वात शक्तिशाली सैन्य असूनही मुघल कधीच नेपाळवर हल्ला करू शकले नाहीत

सकाळ डिजिटल टीम

Mughal History : सर्वात शक्तिशाली सैन्य असूनही मुघल कधीच नेपाळवर हल्ला करू शकले नाहीत. मुघलांनी तसं करण्याचा कधी विचारही केला नव्हता. कारण तेथील भौगोलिक परिस्थिती त्यांच्यासाठी सर्वात मोठा अडथळा होता. मुघलांच्या आधीही नेपाळवरील हल्ले अयशस्वी झाले होते.

बाबरने भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली. पण त्याचा विस्तार अकबराच्या काळात झाला. अकबरानेच भारतीय उपखंडावर मुघल साम्राज्याचे वर्चस्व वाढवले. यानंतर औरंगजेबाच्या कारकिर्दीत सर्वाधिक विस्तार झाला. हा तो काळ होता जेव्हा किल्ल्यासमोर मुघल सैन्य उभे असायचे, ते एकतर युद्धात किल्ला जिंकायचे किंवा संबंधित राजाला तह करून मुघलांची अधीनता मान्य करायला लावायचे.

काबूलपासून कावेरी खोऱ्यापर्यंत आणि गुजरातपासून बंगालपर्यंत फक्त मुघलांचे वर्चस्व होते. पण एक क्षेत्र असे होते की ज्यावर मुघल कधीही आक्रमण करण्याची ताकद एकवटू शकले नाहीत. हा प्रदेश म्हणजे नेपाळ. नेपाळवर आपलं आधिपत्य नसावं असं कधीच मुघलांना वाटलं नव्हतं. त्यांना ते हवंच होतं, पण ना अकबर याचं धैर्य दाखवू शकला ना औरंगजेबाने तिकडे मान वर करून पाहिली. याची अनेक कारणं इतिहासकार देतात, पण सर्वात मोठं कारण म्हणजे हा प्रदेश नैसर्गिकरित्या मजबूत होता.

नेपाळ हा नैसर्गिक किल्ला होता

मुघलांच्या काळातही नेपाळला व्यावसायिक दृष्टिकोनातून विशेष स्थान होतं. पण भौगोलिकदृष्ट्या ते खूप मजबूत होतं. येथील उंच शिखरे, डोंगराळ प्रदेश खरं तर नैसर्गिक पद्धतीने बनलेला किल्लाच होता. घोडे, उंट आणि हत्ती ही मुघल सैन्याची ताकद होती.

इतिहासकारांच्या मते, डोंगराळ प्रदेशामुळे केवळ घोडे, उंट आणि हत्ती, जे मुघल सैन्याचे सामर्थ्य मानले जातात, त्यांची कमजोरी बनू लागले. याशिवाय तेथील थंडीही त्रासदायक होती. ज्या राज्यकर्त्यांनी मुघलांपूर्वी नेपाळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला त्यांना अशा संकटांना तोंड द्यावं लागलं आणि युद्धात पराभव पत्करावा लागला.

मुघल सैन्य सर्वात शक्तिशाली होतं

अकबरापासून औरंगजेबाच्या कारकिर्दीपर्यंत मुघलांकडे सर्वात शक्तिशाली सैन्य होते. मनुचीने लिहिले आहे की, मुघल सैन्यात केवळ तुर्कीच नव्हे तर भारतीय, इराणी आणि अफगाण लोकांचा समावेश होता. परंतु नेपाळचे राज्य आणि तेथील गोरखा सैनिकही अतिशय शूर मानले जात होते. मुघलांच्या आधी नेपाळवरील हल्ल्यात गुरख्यांनी आपले शौर्य सिद्ध केले होते.

मुघल फायदा बघत असत

मुघलांनी नेहमी स्वतःच्या फायद्याकडे लक्ष दिले. हिस्ट्री ऑफ मुघल इंडिया या पुस्तकानुसार मुघल शासकांनी नेहमी ज्या ठिकाणाहून त्यांना संपत्ती मिळेल अशी ठिकाणं ताब्यात घेतली. अर्थात नेपाळला व्यावसायिक महत्त्व होतं. हा भाग काबीज केल्याने मुघलांना फायदा झाला असता, परंतु त्यापेक्षा जास्त खर्च युद्धात झाला असता.

मुघलांच्या आधी हल्ले अयशस्वी झाले होते

नेपाळवर कधीही हल्ला झाला नाही असं नाही. पण त्यात त्यांना कधीच यश आलं नाही. 1349 मध्ये बंगालच्या शमसुद्दीन इलियास शाहने नेपाळवर पहिला हल्ला केल्याचा उल्लेख इतिहासात आहे. तो काठमांडूलाही पोहोचला, पण त्यानंतर त्याला माघार घ्यावी लागली. यानंतर दुसरा बंगाली शासक सुलतान मीर कासिम यानेही नेपाळवर हल्ला केला, पण त्यालाही गोरखांनी हाणून पाडले.

रक्त गोठविणारी थंडी

नेपाळचा हिवाळा रक्त गोठविणारा असायचा. 1349 मध्ये बंगालच्या सुलतान शमसुद्दीनने नेपाळचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या सैन्याला थंडीमुळे सर्वाधिक नुकसान झाले. सैनिकांची बिघडलेली तब्येत, आजारपण आणि गोरखांचा संघर्ष पाहून शमसुद्दीनला परतावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT