fire sakal media
देश

मुळशी अग्निकांड: PM निधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

जखमींना ५०,००० रुपयांची मदत मिळणार

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या उरवडे येथील कंपनीला लागलेल्या भीषण आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमी झालेल्यांना ५०,००० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या घटनेची दखल घेतली असून मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वनं केलं आहे. (Mulshi fire PM announces Rs 2 lakh assistance to relatives of deceased)

उरवडे (ता. मुळशी) येथील औद्योगिक परिसरातील 'एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस' या रासायनिक कंपनीला आज (सोमवार) दुपारी भीषण आग लागली. यामध्ये १८ कामगारांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये १५ महिला आहेत. तर १५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. १५ दिवसांपूर्वी देखील या कंपनीला आग लागल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली.

दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच ही आग आटोक्यात आली असून, कुलिंग ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर आगीचे प्राथमिक कारण समजेल. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे समोर आल्यानंतर दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, या आगीत मंगल नागू आखाडे (खरावडे), सीमा बोराटे (बीड), संगीता गोंदे (मंचर), सुमन ढेबे (खरावडे), संगीता पोळेकर (घोटावडे फाटा), महादेवी अंबारे (सोलापूर), सारिका विलास कुदळे, सुरेखा तुपे (करमोळी) यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मंगल आखाडे यांचा कामाचा आजचा पहिला दिवस होता. हा पहिलाच दिवस दुर्देवाने आय़ुष्याचा शेवटचा दिवस ठरला. एसव्हीएस कंपनीत सॅनिटायझर तयार करण्याच काम सुरू होते. सॅनिटायझर बनविण्याचे काम सुरू असताना कंपनीला अचानक आग लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी रोहित शर्माच्या जागी असतो, तर पर्थ कसोटी खेळण्यासाठी पोहोचलो असतो', Sourav Ganguly च्या विधानाची चर्चा

Latest Maharashtra News Updates live : अमित शाह यांच्याऐवजी स्मृती इराणी आणि शिवराजसिंह चौहान यांच्या सभा

कऱ्हाड उत्तर-दक्षिण मतदारसंघांत आघाडी धर्म? पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील एकाच व्यासपीठावर; दोन्ही गटांनी घेतलं जुळवून!

Election Voting : मतदान कार्ड नाहीये? चिंता कशाला, या 12 पैकी कोणत्याही ओळखपत्रांद्वारे करा मतदान

विद्या नाही , माधुरी नाही तर 'ही' आहे खरी मंजुलिका ; बिहाइंड द सीन व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT