Crime News 
देश

भिकाऱ्याला जिवंत जाळले अन् मेल्याचे नाटक करून 80 लाखांचा विमा हडपला; 17 वर्षांनंतर 'असं' उघड झालं रहस्य

39 वर्षीय व्यक्तीला अहमदाबाद येथून अटक करण्यात आली

Sandip Kapde

अहमदाबाद क्राइम ब्रँचने एक हृदयद्रावक घटना उघडकीस आणली आहे. 17 वर्षांपूर्वी कार अपघातात जळून मृत्यू झाल्याचा बनाव केलेल्या आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीने एका भिकाऱ्याला त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने स्वत:च्या मृत्यूचा बनाव बनवून ठार मारले आणि 80 लाख रुपये विम्याचे पैसे लाटले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसही अचंबित झाले. याप्रकरणी 39 वर्षीय व्यक्तीला अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे.

अहमदाबाद क्राइम ब्रँचने काल (बुधवार) अनिल सिंग चौधरीला कोर्टात हजर केले. चौधरीला 15 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 17 वर्षांपासून हा व्यक्ती ओळख लपवून राहत होता. त्याने स्वतःच्या मृत्यूसाठी एका भिकाऱ्याला त्याच्या कुटुंबाच्या सहाय्याने ठार मारले आणि विम्याचे 80 लाख लाटले. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलसिंग 'राजकुमार विजयकुमार चौधरी' या नावाचा वापर करत असल्याचे आढळून आले. अनिलसिंगने 31 जुलै 2006 रोजी शहरात अपघाती मृत्यू झाल्याचे दर्शवले. मात्र, नंतर हे उघड झाले. अनिल सिंग आणि त्याच्या वडिलांनी या अपघाताची योजना आखली होती, ज्यात एका भिकाऱ्याचा मृत्यू झाला होता.

असा रचला कट-

अटक केल्यानंतर चौधरीने कबुली दिली की त्याने आणि त्याच्या वडिलांनी मृत्यूचा बनाव करून विम्याचे पैसे मिळवण्याची योजना आखली होती. योजनेनुसार, अनिल सिंह चौधरी यांनी 2004 मध्ये अपघाती मृत्यू विमा पॉलिसी घेतली होती. नंतर कार खरेदी केली. कारचा देखील अपघाताच्या सहा महिन्यांपूर्वी विमा काढण्यात आला होता. त्यानंतर अनिल सिंग चौधरी, त्याचे वडील आणि भाऊ यांनी एका भिकाऱ्याला जेवणाचे आमिष दाखविले. या लोकांनी भिकाऱ्याला आग्राजवळील एका हॉटेलमध्ये नेले आणि त्याला नशामिश्रित जेवण दिले.

यानंतर आरोपींनी बेशुद्ध पडलेल्या भिकाऱ्याला कारमध्ये नेले आणि अपघात झाल्याचे भासवण्यासाठी मुद्दाम कार विजेच्या खांबावर आदळली. अपघातामुळे कारला आग लागल्याचे भासवण्यासाठी त्यांनी भिकाऱ्याला ड्रायव्हरच्या सीटवर बसवले आणि कारला आग लावल्याचे सांगितले. अनिल सिंग चौधरीचे वडील विजयपाल सिंग यांनी हा मृतदेह त्यांच्या मुलाचा असल्याचे ओळखले आणि गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नाव बदलून राजकुमार चौधरी असे ठेवले-

त्यानंतर योजनेनुसार विजयपाल सिंह चौधरी यांनी त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू विमा म्हणून 80 लाख रुपयांचा दावा करून रक्कम मिळविली आणि ती रक्कम कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटली गेली. स्वत:चा वाटा घेतल्यानंतर आरोपी अनिल सिंह चौधरी 2006 मध्ये अहमदाबादला आला आणि त्याने कधीही उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गावाला भेट दिली नाही.  तो त्यांना फक्त दिल्ली किंवा सुरतमध्येच भेटत असे. त्याने आपले नाव बदलून राजकुमार चौधरी असे ठेवले आणि त्याच नावाने ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्डही घेतले. (Latest Crime News)

उदरनिर्वाहासाठी त्याने एक ऑटोरिक्षा आणि नंतर कर्जावर कार खरेदी केली. पुढील कारवाईसाठी त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.  निरीक्षक मितेश त्रिवेदी म्हणाले, “आरोपी ड्रायव्हिंग लायसन्स मिळवल्यानंतर अहमदाबादमध्ये भाड्याने रिक्षा चालवत होता. त्याने कर्जावर रिक्षाही घेतली, लग्न केले आणि विम्याची रक्कम मिळाल्यानंतर कार खरेदी केली. त्याचे वडील, भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांसह त्याच्या कुटुंबाने 80 लाख रुपये लाटले."

आग्रा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र आता त्याचे रूपांतर खुनाच्या प्रकरणात होणार आहे. अहमदाबादमध्ये अनिल सिंग यांच्याविरोधात बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिलसिंग याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 465 (बनावट), 476 (मौल्यवान सुरक्षेची खोटी), 468 (फसवणूक करण्याच्या हेतूने बनावट कागदपत्रे) आणि 471 (खोटे दस्तऐवज खरा म्हणून वापरणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT