Murder sakal
देश

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

मारहाणीत कमलाबाईचा जागीच मृत्यू झाला

सकाळ डिजिटल टीम

मंदसौर जिल्ह्यातील भावगढ पोलिस ठाण्याच्या परिसरात बुधवारी ५८ वर्षीय प्रियकराने ६५ वर्षीय प्रेयसीला काठीने मारहाण केली. यानंतर प्रेयसीचा मृत्यू (murder of beloved) झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. दोघेही २० वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live in relation) राहत होते. मोहनलाल मोंगिया (वय ५८) असे आरोपीचे तर कमलाबाई नरसिंग भील (वय ६५) असे मृत वृद्धेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहनलाल आणि कमलाबाई हे बनी गावात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (live in relation) राहत होते. दोन दिवसांपूर्वी स्वयंपाक करण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. मंगळवारी रात्री अकरा वाजताही स्वयंपाकावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. राग अनावर झाल्याने आरोपीने प्रेयसीवर काठीने वार केले. या मारहाणीत कमलाबाईचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

या खुनाची माहिती बुधवारी सकाळी भावगड पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी नीमच एफएसएलच्या टीमला पाचारण केले. एफएसएल पथकाने पुरावे गोळा केल्यानंतर सायंकाळी मृत कमलाबाईचे आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली (accused arrested) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''विनोद तावडे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांच्यावर हल्ला झालाय'' फडणवीस अखेर बोललेच

Vinod Tawde Video: ''हितेंद्र ठाकूर यांनी मला गाडीमध्ये सगळं सांगितलंय'' भाजप नेत्याने टीप दिल्याच्या आरोपावर तावडे स्पष्टच बोलले

यंदा 70 टक्क्यांहून अधिक होईल मतदान! 2014 मध्ये 10.49 लाख तर 2019 मध्ये 12.16 लाख मतदारांनी केले नाही मतदान; 5 वर्षांत सोलापुरात वाढले 4.14 लाख मतदार

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Live Updates : तावडे प्रकरणात पोलिसांनी चौथा एफआयआर नोंदवला

SCROLL FOR NEXT