Azad_Mufti 
देश

Azad Vs Mufti: "मुस्लीम पूर्वी हिंदू होते", आझाद यांच्या विधानावर मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या; माकडही...

आझाद यांच्या विधानामुळं देशभरात ते चर्चेत आले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : काँग्रेसमधून बाहेर पडत डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (DPAP) स्थापन केलेले जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद हे एका विधानामुळं चर्चेत झाले आहेत. भारतातील सर्व मुस्लिम हे पूर्वी हिंदूच होते, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Muslims were Hindus before Mehbooba Mufti speaks on Ghulam Nabi Azad statement)

जम्मू आणि काश्मीर इथं माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुफ्ती यांना आझाद यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना त्यांनी आझाद यांच्या विधानाची खिल्ली उडवली. त्या म्हणाल्या, "मला माहिती नाही की आझाद हे किती मागे गेले होते. (Marathi Tajya Batmya)

तसेच आपल्या पूर्वजांबाबत त्यांना किती माहिती आहे माहिती नाही. पण मी त्यांना जरुर सल्ला देईल की जर त्यांना मागेच जायचं आहे तर त्यांनी मागेच जावं कदाचित त्यांना एखादा माकडं वैगरे त्यांच्या पूर्वजांमध्ये मिळून जाईल" (Latest Marathi News)

आझाद यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

गुलाम नबी आझाद दोडा जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलत होते. काश्मीरचं उदाहरण देताना ते म्हणाले, सहाशे वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये मुस्लिम नव्हते. त्यामुळं आता जे मुस्लिम इथं आहेत, ते काश्मिरी पंडितापासून परावर्तित झालेले आहेत.

इस्लाम १५०० वर्षांपूर्वी धर्माच्या रुपात समोर आला. त्यामुळं जगभरातील सर्व मुस्लीम धर्म परिवर्तित झालेले आहेत. मुस्लीम बाहेरुन आले असणार आहेत. मुघल लष्करातील काही लोक मुस्लीम असतील. पण, इतर सर्व लोक हिंदू किंवा शीख धर्मातून मुस्लीम धर्म स्वीकारलेले असतील.

जगाच्या इतिहासात, इस्लाम फक्त पंधराशे वर्ष जुना आहे. हिंदू धर्म फार जुना आहे. १०-२० लोक मुघल सैन्यासोबत बाहेरुन आले असतील. बाकी सर्वांचं धर्म परिवर्तन झालं आहे. काश्मीर हे त्याचं एक उदाहरण आहे, ही भूमी आपलीच आहे, असंही आझाद यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT