Sachin Pilot sakal
देश

Sachin Pilot: माझ्या वडिलांनी बॉम्बहल्ला केला, पण...; सचिन पायलट यांनी भाजप नेत्याला पाडलं तोंडघशी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना काँग्रेस आणि भाजप यांच्यामधील वाद-प्रतिवादाला धार आली आहे. काँग्रेस नेचे सचिन पायलट यांनी मंगळवारी भाजप आयटी विभागाचे प्रमुख अमित मालविया यांच्यावर पलटवार केला. मालविया यांनी दावा गेला होता की, 'सचिन पायलट यांच्या वडिलांनी मार्च १९६६ मध्ये हवाई हल्ला करुन मिझोरामवर बॉम्बहल्ला केला.' पायलट यांनी यावर उत्तर देताना म्हटलं की, 'माझ्या वडिलांनी बॉम्बहल्ला तर केला आहे, पण तो मिझोरामवर नाही तर पाकिस्तानवर.' (My Father Did Drop Bombs But not on mizoram Sachin Pilot Slams BJP Leader amit malviya Tweet)

मालविया यांनी 'एक्स'वर पोस्ट करत दावा केला होता की, 'राजेश पायलट आणि सुरेश कलमाडी भारतीय हवाईदलाचे विमान उडवत होते. त्यांनी ५ मार्च १९६६ रोजी मिझोरामची राजधानी ऐझॉलवर बॉम्बहल्ला केला होता. त्यानंतर राजेश पायलट आणि सुरेश कलमाडी काँग्रेसच्या तिकीटावर मंत्री झाली. इंदिरा गांधी यांनी त्यांना राजकारणात घेऊन बक्षीस दिले हे स्पष्ट आहे. ज्यांनी आपल्याच लोकांवर बॉम्बहल्ला केला त्यांना सन्मान देण्यात आला.'

सचिन पायलट यांनी भाजपचा दावा फेटाळला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करुन त्यांनी उत्तर दिलंय. तुमच्याकडे चुकीची तारीख आणि माहिती आहे. होय माझे वडील भारतीय हवाई दलाचे पायलट होते. माझ्या दिवंगत वडिलांनी बॉम्बहल्लाही केला आहे. पण, तो १९७१ मध्ये भारत-पाक युद्धात पूर्व पाकिस्तानवर केला आहे. त्यांनी ५ मार्च १९६६ रोजी मिझोरामवर बॉम्ब हल्ला केलेला नाही.

भाजप नेता तोंडघशी

माझे वडील २९ ऑक्टबर १९६६ मध्ये हवाईदलात आले. त्यांचे सर्टिफिकेट येथे देत आहे. जय हिंद आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, असं म्हणत पायलट यांनी प्रत्युत्तर दिलंय. पायटल यांच्या प्रत्युत्तरामुळे अमित मालविया यांना तोंडघशी पडावं लागलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रेस मणिपूरबाबत बोलत आहे, पण १९६६ मध्ये काँग्रेसने मिझोरामच्या लोकांवर बॉम्बहल्ला केला. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी १९६२ मध्ये आसामच्या लोकांना वाऱ्यावर सोडले होते, अशी टीका केली होती. यावर उत्तर म्हणून काँग्रेसने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते याची आठवण करुन दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT