Joe Biden Innauनवी दिल्ली : अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांनी शपथ घेतली. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडेन यांचं अभिनंदन केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत बायडेन आणि हॅरिस यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "जो बायडेन याचं हार्दिक अभिनंदन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भारत-अमेरिका सामरिक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी त्यांच्याबरोबर काम करण्याची मी अपेक्षा करतो. सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि जागतिक शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र उभे राहू.
ते पुढे म्हणाले, भारत-अमेरिका भागीदारी ही सामायिक मूल्यांवर आधारित आहे. दोन्ही देशातील संबंध आणखी भरीव करण्यासाठी तसेच आर्थिक गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न करूया. भारत-अमेरिका भागीदारी आणखी मोठ्या उंचीवर नेण्यासाठी नव्या राष्ट्राध्यक्षांसोबत काम करण्यास वचनबद्ध आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथ सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष्य लागलं होतं. जो बायडेन यांनी अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निरोपीय भाषणात कुटुंबीय आणि मित्रांचे आभार मानले. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर त्यांना वॉशिंग्टन विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
शपथ घेण्यापूर्वी जो बायडेन यांनी 'अमेरिकेसाठी एक नवा दिवस' अशा आशयाचं ट्विट केलं आहे. 1973 मध्ये बायडेन हे सर्वात युवा सीनेटर म्हणून डेलायवेअरमधून निवडून आले होते. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी देशातील पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला आहेत, ज्या अमेरिकेसारख्या शक्तिशाली राष्ट्राच्या दुसऱ्या ताकदवार पदावर विराजमान होतील.
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.