Narendra Modi 
देश

Lok Sabha Result 2024: लोकसभा निकालाचा 'एन' फॅक्टर! मोदींची तिसरी टर्म दोन नेत्यांवर अवलंबून, हालचालींना वेग

lok sabha elections in india 2024: एनडीएने २९५ जागांवर आघाडी घेतली आहे. असे असले तरी २०१४ आणि २०१९ त्या तुलनेत भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होऊ लागले आहेत. सध्याच्या कलानुसार भाजप सरकार स्थापन करत असल्याचं दिसत आहे. एनडीएने २९५ जागांवर आघाडी घेतली आहे. असे असले तरी २०१४ आणि २०१९ त्या तुलनेत भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे एन फॅक्टरची चर्चा सुरु झाली आहे.

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागत असतानाच एन फॅक्टर म्हणजे नमो, नितीश आणि नायडू हे तीन एन फॅक्टर महत्त्वाचे ठरणार आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात निवडणूक लढलेल्या एनडीएला बहुमत मिळत आहे. पण एकटा भाजप बहुमतापासून दूर असल्याचं चित्र आहे

नेहरु यांच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी मोदींना दोन एन फॅक्टरची गरज लागणार आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची साथ भाजपला लागणार आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे काय निर्णय घेतात यावर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेडला १४ जागा मिळत आहेत, तर आंध्र प्रदेशातील नायडूंच्या तेलुगु देसम पक्षाला (टीडीपी) १६ जागा मिळत आहे.

जेडीयू आणि टीडीपी हे सध्या एनडीएचा भाग आहेत. आपापल्या राज्यात यांनी एनडीएसोबत निवडणूक लढवली आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघांच्या पक्षाला एकत्रित ३० जागा मिळताना दिसत आहेत. भाजपकडे पाहिलं तर घटक पक्षांशिवाय भाजपकडे जवळपास २६५ जागा आहेत. बहुमताचा आकडा हा २७२ आहे. याचा सरळ अर्थ मोदींना नितीश आणि नायडू यांची मर्जी सांभाळावी लागणार आहे.

माहितीनुसार, भाजपने दोन्ही पक्षांची चर्चा सुरू केली आहे. नरेंद्र मोदी यांनी चंद्राबाबू नायडू यांना फोन केला असल्याची माहिती आहे. तसेच नितीश कुमार हे सध्या दिल्लीमध्येच आहेत. त्यांनी काल मोदींची भेट घेतली होती. सध्याचे वातावरण पाहता नितीश आणि नायडू महत्त्वाच्या भूमिकेत आले आहेत. काँग्रेसने देखील त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचं समजतंय. त्यामुळे हे दोन्ही नेते भाजपसोबत राहतात की वेगळा निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT