Nalanda conservation plan Order Archaeological Survey Department Government of Bihar sakal
देश

नालंदा जतनासाठी तातडीने आराखडा द्या; पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचा बिहार सरकारला आदेश

जागतिक वारसा स्थळ असलेल्या या प्राचीन केंद्राचे अवशेष अध्ययनासाठी जतन करण्याचा उद्देश

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : नालंदा महाविहारचे जतन करण्यासाठी काय योजना आखली आहे हे तातडीने सादर करावे असा आदेश भारतीय पुरातत्त्व खात्याने (एएसआय) बिहार सरकारला दिला आहे. जागतिक वारसा स्थळ असलेल्या या प्राचीन केंद्राचे अवशेष अध्ययनासाठी जतन करण्याचा उद्देश आहे. याविषयी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया दीर्घ काळापासून प्रलंबित आहे. ही योजना व त्याच्या पूर्ततेचा तपशील पॅरिस-स्थित जागतिक वारसा केंद्राकडे (वर्ल्ड हेरिटेज सेंटर-डब्लूएचसी) निर्धारित वेळेत सादर करण्याची आवश्यकता आहे.

अन्यथा युनेस्कोच्या प्रतिष्ठेच्या जागतिक वारसा केंद्रांच्या यादीतून नालंदा महाविहारचे नाव वगळले जाण्याचा धोका आहे, असा इशाराही एएसआयकडून देण्यात आला. जागतिक वारशाशी संबंधित सर्व बाबींत युनेस्कोचे समन्वयक म्हणून डब्लूएचसी काम बघते. एएसआयच्या पाटणा विभागाच्या अधिक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ गौतमी भट्टाचार्य यांनी सांगितले की, युनेस्कोचे जागतिक वारसा केंद्र म्हणून नालंदा महाविहार येथे शिलालेख कोरण्यात आला त्यावेळी एकात्मिक विकास आराखड्याबाबत निष्ठा प्रदर्शित करण्यात आली. आता त्यादृष्टिने पूर्तता करण्यात आलीच पाहिजे. याआधीचे स्मरणपत्र आम्ही सोमवारीच धाडले. यासंदर्भात ‘पीटीआय'ने नालंदा जिल्हा दंडाधिकारी शशांक शुभंकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळू शकला नाही. कला, संस्कृती खात्याच्या सचिव बंदना प्रेयाशी यांच्याशीही संपर्क साधणे या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीला शक्य झाले नाही.

पूर्ततेसाठी महत्त्वाच्या बाबी

नालंदा महाविहारच्या आराखड्याच्या पुर्ततेमध्ये दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. राज्य महामार्ग क्रमांक ८० आणि ११० यांच्यामधील रस्ता हे स्थळ आणि वस्तुसंग्रहालय यांच्यामधून जातो. वाहनांच्या वाहतुकीचे नियमन आणि प्रदूषणाचा वारसा स्थळावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चीत करणे गरजेचे आहे. याशिवाय प्रवेशद्वारापाशीच फेरीवाल्यांची गर्दी ही समस्या जटिल बनली आहे.

गेल्या काही महिन्यांत नालंदा जिल्हा प्रशासनाला स्मरणपत्रे घाडली. आम्ही स्मरणपत्राची प्रत कला, संस्कृती व युवक कल्याण तसेच नगरविकास, गृहबांधणी या खात्यांच्या प्रधान सचिवांनाही धाडली आहे. परंतु त्याची पुर्तता झालेली नाही. डब्लूएचसीची बैठक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्याआधी पूर्तता झाली नाही तर नालंदाचा दर्जा गमावण्याचा धोका आहे. तसे झाल्यास देशासाठी ती लाजिरवाणी बाब ठरेल.

- गौतमी भट्टाचार्य, अधिक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT