इंद्रलोकमध्ये रस्त्यावर नमाज पढणाऱ्या मुस्लीम व्यक्तींना एक पोलीस अधिकारी लाथा मारत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या प्रकरणावरुन अद्याप वातावरण तापलेलं आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. याच संदर्भातील एक नवा व्हिडिओ समोर आला आहे.या दरम्यान दावा केला जात आहे की, जमलेल्या जमावाने उपस्थित पोलिसांवर हल्ला केला. लाथ मारणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर शनिवारी पोलिसांच्या उपस्थितीत जमावाने हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे.(Namaz on Road Delhi Police clarifies viral post claiming attack on cop involved in Namaz row)
पोलिस आणि स्थानिक लोकांमध्ये झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला जात आहे. व्हिडिओ शेअर करताना यूजरने लिहिले की, 'दिल्लीत काल एका नमाज करणाऱ्या लोकांना लाथ मारणाऱ्या पोलिस अधिकारी मनोज तोमर यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत हल्ला झाला.' डीसीपी उत्तर दिल्लीच्या अधिकृत एक्स हँडलने हा दावा खोटा असल्याचे फेटाळून लावले.
या संपुर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पोलिस उपायुक्त म्हणाले, 'ही चुकीची माहिती आहे. उल्लेख केलेला SI या व्हिडिओमध्ये उपस्थित नाही. हा व्हिडिओ कालचा (शनिवार) नसून ८ मार्चचा आहे जेव्हा आंदोलक इंद्रलोकमध्ये जमले होते. स्थानिक लोकांनी पोलिस अधिकाऱ्यांची सुटका करून त्यांना पोलिस चौकीत आणले, त्यानंतर हाणामारी झाली'.
इंद्रलोकमधील या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहेत. नमाज पढणाऱ्या लोकांना लाथा मारत असल्याचा पहिला व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर, मोठ्या संख्येने लोकांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला आणि चार तास आंदोलन केले. यानंतर आरोपी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. त्यानंतर आलेल्या एका लांबलचक व्हिडिओमध्ये हे देखील दाखवण्यात आले आहे की, जमलेल्या जमावाला हटवण्यासाठी मनोज तोमर यांनी . नमाज पढणाऱ्या धक्काबुक्की करून रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान काही लोक त्यांच्याशी भांडतात आणि एका व्यक्तीने त्यांच्यावर हेल्मेट घालून हल्ला केला.
8 मार्चच्या घटनेनंतर इंद्रलोकमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या परिसरात सुरक्षा दलाचे जवान चोख बंदोबस्त ठेवत आहेत. वातावरण बिघडवणाऱ्या घटकांवर नजर ठेवण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.