west bengal ani
देश

तृणमूल कार्यकर्त्यांची CBI कार्यालयावर दगडफेक

कार्तिक पुजारी

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल (TMC) सरकारमधील २ मंत्र्यांसह ४ नेत्यांना सीबीआयने अटक केल्याने राजकारण तापलं आहे.

कोलकाता (Narada Sting Operation)- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल (TMC) सरकारमधील २ मंत्र्यांसह ४ नेत्यांना सीबीआयने अटक केल्याने राजकारण तापलं आहे. अटक भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप करत टीएमसी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते दुपारी सीबीआयच्या कार्यालयाबाहेर (CBI office) धडकले असून निदर्शने करण्याबरोबरच दगडफेक केली आहे. कोणत्याही प्रकारचे संकट टाळण्यासाठी सीबीआय कार्यालयाचे मुख्य गेट बंद करण्यात आलंय. याशिवाय केंद्रीय सुरक्षा दलांना सीबीआयच्या कार्यालयामध्ये आणि मुख्य गेटच्या बाहेर तैनात करण्यात आलं आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Narada Sting Operation CBI office tmc workers mamta banerjee bjp)

सीबीआयने Narada Sting Operation प्रकरणी तृणमूलचे मंत्री फिरहाद हाकीम यांच्यासह सुब्रम मुखर्जी, मदन मित्रा आणि सोव्हान चॅटर्जी यांना चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात आणलं आहे. सोवन चॅटर्जी हे माजी महापौर आहेत. दरम्यान, नेत्यांना अटक केल्यानंतर काही वेळातच ममता बॅनर्जीसुद्धा सीबीआय कार्यालयात पोहोचल्या. सीबायच्या प्रवक्त्याने सांगितलं की, '४ तत्कालीन मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. १६ एप्रिल २०१७ च्या कोलकाता हायकोर्टाच्या आदेशानुसार एजेन्सीने गुन्हा दाखल केला आहे. आजच चारही नेत्यांना चार्जशीटसह कोर्टामध्ये आणलं जाईल.'

राज्यपालांची ट्विट करुन ममतांवर केली टीका

बिघडत्या स्थितीमुळे मी चिंतीत आहे. ममता बॅनर्जीसोबत चर्चा करुन संविधानिक नियम आणि कायद्यांचे पालन करण्याची मागणी केली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना आवश्यक ते सर्व पाऊल उचलायला हवेत. दु:खद आहे की ऑथेरिटीकडून कोणतीही कारवाई केली जात नाहीये, त्यामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे, असं ट्विट राज्यपाल धनखड यांनी केलंय.

काय आहे नारदा प्रकरण?

नारदा स्टिंग ऑपरेशनमधील घोटाळा हा 2016 च्या विधानसभा निवडणुकीवेळचा आहे. निवडणुकी आधी नारदा स्टिंग टेप प्रसारीत करण्यात आली होती. यामध्ये तृणमूलचे मंत्री, खासदार आणि आमदार हे खोट्या कंपनीच्या लोकांकडून पैसे घेत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. हे स्टिंग ऑपरेशन 2014 मध्ये करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT