- विहंग ठाकूर
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) आज केंद्रीय गृह मंत्री अमित शहा (amit shah) यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान (jan ashirwad yatra) महाराष्ट्र सरकारच्या वतीने बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली, असे नारायण राणेंचे म्हणणे आहे. या संदर्भातच नारायण राणे अमित शहा यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
आज दुपारी केंद्रीय गृह मंत्रालयात ही भेट होणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्र्यावर बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी नारायण राणे करणार आहेत.
मागच्या महिन्यात जनआशीर्वाद यात्रे दरम्यान कोकणात असताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले होते. ज्या दिवशी त्यांना अटक झाली. त्याचदिवशी त्यांना जामीनही मिळाला होता.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. शिवसेनेने ठिकठिकाणी नारायण राणेंविरोधात हिंसक आंदोलनं केली होती. नारायण राणेंच्या जुहू बंगल्याबाहेर शिवसैनिक आणि राणे समर्थक भिडले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.