नरेंद्र मोदी 
देश

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदींचा 'मास्टरस्ट्रोक'

नामदेव कुंभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी केंद्रीय सहकार मंत्रालयाची (मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशन) स्थापना केली आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करण्यात येणार आहे. या माध्यमातून सहकार क्षेत्राला सक्षम करण्यात येणार आहे. 'सहकार से समृद्धी' असं या मंत्रालयाचं व्हिजन असेल देशातील सहकार चळवळीतील प्रशासन, कायदे, धोरणात्मक चौकटीची क्षमता वाढवणे हा या नव्या मंत्रालयाचा उद्देश असणार आहे. तसेच सहकाराचा पाया भक्कम करण्यासाठी उपयोग होणार आहे. याच बरोबर मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह संस्थांच्या विकासासाठीही काम करण्यात येईल.

सरकारच्या निर्णयानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. अमित शाह यांनी ट्वीट करत सांगितलं की, "हा निर्णय सहकारी क्षेत्र आणि या क्षेत्राशी निगडीत व्यक्तिंना सक्षम करण्यासाठी मदत करेल. भारताच्या सहकारी क्षेत्राला नवीन उंचीवर नेईल." पुढे बोलताना ते म्हणाले की, "गेली 7 वर्षे मोदी सरकार देशातील गावं, गरीब आणि शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी, तसेच त्यांच्याशी संबंधित व्यवसायांना स्वावलंबी करण्यासाठी सतत सेवा देत आहे."

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्याच मंत्रिमंडळाचा आज (ता. ७) रोजी विस्तार (Expansion) होण्याची शक्यता आहे. सायंकाळी ६ वाजता प्रमुख नेत्यांचा शपथविधी समारंभही पार पडेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्‍चित मानला जात असून सध्या तेही दिल्लीत तळ ठोकून आहेत. नव्या विस्तारात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह किमान ६ ते ८ कॅबिनेट मंत्री शपथ घेतील अशी शक्यता आहे.

आज मंत्रिमंडळ बैठक

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज (ता. ७) बैठक होणार असून या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा गोठवलेला महागाई भत्ता (डीए) पुन्हा बहाल करण्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात सकाळी 9.00 वा. पर्यंत 7.38 टक्के मतदान

Traffic Update: मतदारांची गावी जाऊन मतदान करण्यासाठी धडपड; मात्र वाहतूक कोंडीचं विघ्न, मुंबई-गोवा महामार्गावर लांबच लांब रांगा

Chatrapati Sambhajinagar Assembly Election : मतदार संख्येत भर; शाई वाढली, मतदान केंद्रांना तब्बल ७ हजार २०० बाटल्यांचा पुरवठा

Nashik Vidhan Sabha Election : बालेकिल्यात मंत्री छगन भुजबळ यांनी कुटुंबीयांसमवेत प्रथमच बजावला मतदानाचा हक्क

प्राजक्ता माळी ते सोनाली कुलकर्णी, मराठी कलाकारांनीही बजावला मतदानाचा हक्क; शेअर केले फोटो

SCROLL FOR NEXT