नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली अनं सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना शपथविधीच्या कार्यक्रमासाठी निमंत्रणही दिलं. दरम्यान, रविवारी, ९ जून रोजी मोदींची पंतप्रधानपदाचा शपथविधी पार पडणार आहे. (Narendra Modi meets President Droupadi Murmu Rashtrapati Bhavan and stakes claim to form the government)
नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अर्थात एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर मोदी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी राष्ट्रपती भवन इथं दाखल झाले आणि त्यांनी आपल्या समर्थक खासदारांच्या सह्यांचं पत्र राष्ट्रपतींकडं सादर केलं आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. तसंच रविवारी, ९ जून रोजी होणाऱ्या शपथविधीला हजेरी लावण्याचं निमंत्रण दिलं.
दरम्यान, मोदींनी राष्ट्रपती भवन इथून संबोधन केलं. यावेळी त्यांनी म्हटलं की, "जनतेनं मला तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी दिली यासाठी मी त्यांचे आभार मानतो. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर त्यांनी मंत्रीमंडळाची यादी पाठवण्याची सूचना केली आहे.
राष्ट्रापतींना मी सांगितलं आहे की, ९ तारखेला संध्याकाळी शपथविधीसाठी सोयीची वेळ असेल. यासंबंधीची सविस्तर माहिती राष्ट्रपती भवन देईलच. पण तोवर आम्ही मंत्रीमंडळाची यादी राष्ट्रपतींकडं सुपूर्द करु त्यानंतर शपथविधी पार पडेल"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.