Narendra Modi Oath Ceremony esakal
देश

Narendra Modi Oath Ceremony : पंतप्रधान मोदींच्या शपथविधीला ७ हजार लोक लावणार हजेरी, निमंत्रण पत्रिका पाहिलीत का?

सकाळ डिजिटल टीम

Narendra Modi Oath Ceremony :

सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि घटक पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे लवकरच नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आली आहे.

या सोहळ्याला तब्बल ७ हजार लोकांना निमंत्रण देण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी ७००० लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी उद्या, रविवारी संध्याकाळी ७.१५ वाजता शपथ घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला २९३ जागा मिळवता आल्या नाहीत. मात्र, एनडीएला बहुमत मिळाले. एनडीएला २९३ जागा मिळाल्या. यापैकी भाजपला 240 जागा मिळाल्या. दुसरीकडे, इंडिया अलायन्सला २३४ जागा मिळाल्या. यामध्ये काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या.

पंतप्रधानांच्या शपथविधीच्या निमंत्रणाची पत्रिका समोर आले आहे. नरेंद्र मोदी उद्या सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शुक्रवारी त्यांची एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. यानंतर त्यांनी राष्ट्रपतींसमोर सरकार स्थापनेचा दावा मांडल्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांना रविवारी सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले.

मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्लीला नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आले आहे. राज्यभर पोलिसांचा कडक पहारा राहणार आहे.

बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि सेशेल्स या देशांचे प्रमुख नेते मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष वावेल रामखेलावान यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

सुरक्षा व्यवस्था वाढवली

शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीला नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आले आहे. सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ड्रोन उडवण्यास आणि पॅराग्लायडिंगवर बंदी घालण्यात आली आहे. ९-१० जून रोजी दिल्लीत कलम १४४ लागू राहणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या ५ कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर्स तैनात असणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT