PM Modi Speech 
देश

PM Modi Speech: स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरुन राजकीय भाष्य! म्हणाले...

Sandip Kapde

PM Modi Speech : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सरकारच्या यशाची माहिती दिली. आपण आपल्या बळावर देशाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. हा आमचा संकल्प आहे. आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा एक भाग आहोत. हे आमचे सौभाग्य आहे. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी सर्व देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी यावेळी राजकीय भाष्य देखील केले. नाव न घेता त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

काँग्रेसवर भाजपकडून नेहमी घराणेशाहीच्या मुद्द्यावर टीका होत असते. आज मोदींनी भाषणादरम्यान काँग्रेवर नाव न घेता हल्ला केला. भ्रष्टाचार-कुटुंबवाद आणि तुष्टीकरण या तीन वाईट गोष्टींविरुद्ध लढण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. या अशा गोष्टी आहेत, ज्या आपल्या देशातील लोकांच्या आशा-आकांक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई आपल्याला पुढे न्यावी लागेल. (latest marathi news)

मोदी म्हणाले की, भ्रष्टाचार आणि कुटुंबवादाने देश घट्ट पकडला होता. हे देशाचे दुर्दैव  आहे. आज देशात अशी विकृती आली आहे. घराणेशाही पक्षांचा जीवनमंत्र हा आहे की त्यांचा राजकीय पक्ष कुटुंबाचा, कुटुंबाचा आणि फक्त कुटुंबाचा असतो.

"2014 मध्ये जेव्हा आपण सत्तेत आलो तेव्हा जागतिक आर्थिक व्यवस्थेत आपण 10व्या क्रमांकावर होतो. आज 140 कोटी भारतीयांच्या प्रयत्नाने आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत, असं झालं नाही. देश भ्रष्टाचाराच्या राक्षसाच्या तावडीत  होता. आम्ही गळती थांबवली आणि एक मजबूत अर्थव्यवस्था निर्माण केली," असे मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी म्हणाले, "2014 मध्ये तुम्ही मजबूत सरकार बनवले. 2019 मध्ये तुम्ही सरकार स्थापन केले. त्यामुळे मोदींना सुधारणा करण्याची हिंमत आली. यातूनही परिवर्तन दिसून येते. 1000 वर्षांपर्यंत आपले भविष्य घडवणाऱ्या बदलाला प्रोत्साहन देण्याची आमची दृष्टी आहे. आपली युवा शक्ती भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी होईल."

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "2019 मध्ये, कामगिरीच्या जोरावर, तुम्ही मला पुन्हा एकदा आशीर्वाद दिला... पुढील पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची आहेत. 2047 चे स्वप्न साकार करण्याचा सर्वात मोठा सुवर्ण क्षण म्हणजे येणारी पाच वर्षे. पुढील 15 ऑगस्टला या लाल किल्ल्यावरून मी तुमच्यासमोर देशाची उपलब्धी आणि घडामोडी मांडणार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT