Prashant Kishor 
देश

Prashant Kishor: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर काय करणार? पीकेंनी मोठ्या 4 बदलांची केली भविष्यवाणी

Modi Will be PM third time said Prashant Kishor: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी येत्या लोकसभा निवडणुकीचे काय चित्र असेल याबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी येत्या लोकसभा निवडणुकीचे काय चित्र असेल याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील असं ते म्हणाले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत बोलताना भाजपला ३०३ किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर चार मोठे बदल करतील असं देखील प्रशांत किशोर म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटीच्या कक्षेत आणले जाऊ शकते. तसेच मोदी सरकार राज्यांकडे असणाऱ्या वित्तिय अधिकारांवर निर्बंध आणेल, असं पीके म्हणाले आहेत.

भ्रष्टाचार विरोधी दृष्टीकोनामध्येही मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात बदल पाहायला मिळेल, असं पीके म्हणालेत. पेट्रोल आणि डिझेलवर १०० टक्क्यांपेक्षा जास्त कर आकारला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून याला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी होत आली आहे. त्यामुळे याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.

राज्याकडे आर्थिक उत्पन्नासाठी तीन प्रमुख स्रोत असतात. पेट्रोलियम, मद्य आणि भूमी. त्यामुळे पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटीच्या कक्षेत आणल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. सरकारने असा निर्णय घेतला तर पेट्रोलियन उत्पादनांवर २८ टक्के कर लावला जाईल, असं पीके म्हणाले.

पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणलं तर त्याचा सर्वात मोठा फटका राज्यांना बसेल, कारण त्यांना करावर पाणी सोडावं लागेल. आपला हिस्सा मिळवण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारवर अवलंबून राहावं लागेल. त्यामुळे राज्यांची आर्थिक स्वायत्तता कमी होईल, असं पीकेंनी म्हटलं. मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ दमदार असेल, कारण त्यांच्याकडे शक्ती आणि संसाधन दोन्ही असेल असंही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी कोणते चार बदल करतील?

प्रशांन किशोर यांच्या दाव्यानुसार

१. पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणले जातील

२. पेट्रोल-डिझेलवर २८ टक्के जीएसटी लागेल

३. राज्यांची आर्थिक स्वायत्तता कमी होईल

४. भ्रष्टाचार विरोधी दृष्टीकोनात बदल होणार

प्रशांक किशोर हे राजकीय तज्ज्ञ मानले जातात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते नरेंद्र मोदींच्या प्रचार टीममध्ये होते. भाजपच्या विजयात त्यांचा वाटा असल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर त्यांनी अनेक राजकीय पक्षांना निवडणुकीच्या काळात मदत केली आहे. सध्या त्यांनी स्वत:ची जन सुराज्य संघटना सुरू केली आहे. याअंतर्गत ते बिहारच्या गावागावात फिरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT