National Civil Services Day esakal
देश

National Civil Services Day : सिव्हील सर्व्हिसेसमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार अन् मिळणाऱ्या सुविधा

आपण सिव्हील सर्विसेसअंतर्गत येणाऱ्या जॉब पोझिशन्ससाठी पगार किती व त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

National Civil Services Day : सिव्हील सर्व्हिसेसची बऱ्याच विद्यार्थ्यांना क्रेज असते. तर बरेच विद्यार्थी अगदी दहावी बारावीपासून सिव्हील सर्व्हिसेसमधे जाण्यासाठी तयारी करत असतात. आज नॅशनल सिव्हील सर्व्हिसेस डे आहे. त्यानिमित्ताने आपण सिव्हील सर्विसेसअंतर्गत येणाऱ्या जॉब पोझिशन्ससाठी पगार किती व त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घेऊया.

आज म्हणजेच २१ एप्रिलला दरवर्षी, सिव्हील सर्व्हंट्स म्हणजेच नागरी सेवक स्वतःला नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित करतात आणि त्यांच्या सुखसुविधांसाठी स्वत:ला त्यांच्या प्रामाणिक कार्यासाठी वचनबद्ध करतात. राष्ट्रीय नागरी सेवा दिवस काय आहे आणि तो दरवर्षी 21 एप्रिल रोजी का साजरा केला जातो तेही आज आपण थोडक्यात जाणून घेऊया.

देशातील विविध सार्वजनिक सेवा विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या कामाची पावती देण्यासाठी दरवर्षी २१ एप्रिल रोजी हा दिवस पाळला जातो. हा दिवस नागरी सेवकांना देशाची प्रशासकीय यंत्रणा एकत्रितपणे आणि नागरिकांच्या सेवेच्या समर्पणाने चालवण्याची आठवण करून देणारा आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या विज्ञान भवनात सकाळी ११ वाजता देशातील सिव्हील सर्व्हंट्सना संबोधित करणार आहेत.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार https://www.ambitionbox.com ने सिव्हील सर्व्हंट्सना वर्षाला किती पगार मिळतो याचे काही अंदाजे आकडे शेअर केलेत. त्यानुसार सिव्हील सर्व्हंटचे दरवर्षीचे वार्षिक उत्पन्न १० लाख ते १४ लाखांदरम्यान असते. या क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना याशिवाय शासनामार्फत अनेक सुविधा दिलेल्या असतात. (National Civil Service Day)

सिव्हील सर्व्हंट्सना मिळतात या सुविधा

सिव्हील सर्व्हंट्सना इलेक्ट्रिसिटी, पाणी आणि फोन कनेक्शन्ससुद्धा मोफत असते. तसेच त्यांच्या राहाण्याचा घराचा खर्चसुद्धा शासन करते. (UPSC)

India.com च्या माहितीनुसार IAS पदावर कार्यरत अधिकाऱ्यास सुरक्षेसाठी 3 होम गार्ड आणि 2 बॉडीगार्ड्स असतात. तसेच त्यांच्या जिवाला धोका जाणवल्यास त्यांच्यासाठी सेक्युरिटी फोर्स कमांडोज तैनात केले जातात. शासनाकडून राहाण्यासाठी मिळालेल्या घरात शासनाच्या खर्चात त्यांना कूक, सफाईकामगार आणि आणखी बऱ्याच सुविधा मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT