Consumers Should Aware About This: दैनंदिन गरजेच्या रोज कितीतरी वस्तू आपण ग्राहक म्हणून दुकानांतून विकत घेत असतो. मात्र अनेकदा तुमची अनेक बाबतींत फसवूणकही होते. तेव्हा वेळेआधीच तुमची नेमकी कुठल्या ठिकाणी नकळत फसवणूक होऊ शकते ते आज आपण जाणून घेऊया.
या ठिकाणी होऊ शकते ग्राहकांची फसवणूक
१) ऑनलाइन प्लॅटफॉर्म - तरुण पिढीसह वयोवृद्धांनादेखील हल्ली ऑनलाइन शॉपिंगचं वेड लागलं आहे. सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना दिसणाऱ्या आकर्षक रिल्स आणि पोस्ट बघून अनेकजण त्याच्या मोहात पडतात. आणि त्या वस्तू विकत घेतात. मात्र हे करत असताना अनेक सोशल मीडिया अकाउंट फेक असतात.
या फेक अकाउंटवर तुम्हाला कॅश ऑन डिलीवरी कधीच उपलब्ध नसणार. तेव्हा अशा अकाउंटवर शॉपिंग करू नका.
२) फेक साइट्स - येथे तुम्हाला प्रोडक्टची संपूर्ण माहिती दिली जाते. तुम्ही येथून सहज ऑर्डरही करू शकता. मात्र तुम्ही पेमेंट केल्यानंतर या वस्तू तुमच्यापर्यंत कधीच येत नाही. तेव्हा तुम्ही वस्तू ऑर्डर करत असलेली साइट ऑथेंटिक आहे की नाही याची पूरेपूर खात्री करून घ्या.
३) वस्तूचे बिल आवर्जून घ्यावे - अनेकदा तुम्ही दुकानातून वस्तू विकत घेता मात्र त्याचे बिल तुम्हाला मिळत नाही. तुमच्याजवळ पुरावा नसल्याने ही वस्तू वेळेआधीच खराब झाल्यास तुमची त्यासंबंधिची तक्रारही मान्य केली जात नाही. तेव्हा कुठलीही वस्तू विकत घेताना दुकानदाराकडून बिल नक्की मागवून घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.