देश

तिरंगा फडकावल्यावर होणार फुलांची बरसात; पहिल्यांदाच दिसणार असं दृश्य

विनायक होगाडे

नवी दिल्ली : देशभरात १५ ऑगस्ट रोजी ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र, यावेळचा स्वातंत्र्यदिन आणखी काही कारणांसाठी वेगळा ठरणार आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या १५ ऑगस्ट रोजी जेंव्हा पंतप्रधान मोदी राष्ट्रध्वज फडकावतील तेंव्हा आकाशातून दोन Mi-17 1V  हेलिकॉप्टर्समधून फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. Mi-17 1V  एक शक्तीशाली हेलिकॉप्टर आहे. यामध्ये एवियोनिक्स, ग्लास कॉकपिट इन्स्ट्रूमेंटेशन, अत्याधुनिक नौवहन उपकरण इत्यादी फिचर्स आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावतील. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करण्यासाठी मार्च २०२१ मध्ये गुजरातमधील साबरमती आश्रमामधून 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' समारोहाची सुरुवात केली होती.

14 ऑगस्टला 'फाळणी भयावह स्मरण दिवस'

स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या दिवसाची आठवण काढली. देशाच्या फाळणीला कधीही विसरले जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिसेंमुळे आपल्या लाखो लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्या लोकांचा संघर्ष आणि त्यागाच्या आठवणीत 14 ऑगस्टला 'फाळणी भयावह स्मरण दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं मोदी म्हणालेत. त्यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. #PartitionHorrorsRemembranceDay हा दिवस आपल्याला भेदभाव, द्वेष आणि वैर या विषाला नष्ट करण्यासाठी केवळ प्रेरित करणार नाही, तर एकता, सामाजिक सद्भावना आणि मानवी संवेदना मजबूत करण्यासाठी मदत करेल. ट्विट करुन पंतप्रधान मोदींनी याबाबत माहिती दिली. देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिवस उद्या साजरा केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT