shrinivas ramanujan 
देश

National Mathematics Day: राष्ट्रीय गणित दिवस; जाणून घ्या का साजरा केला जातो

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली  National Mathematics Day 2020- भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची आठवण म्हणून 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांचा जन्म 1887 साली झाला होता. 2012 मध्ये माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी राष्ट्रीय गणित दिवसाची घोषणा केली होती. 

रामानुजन यांचा जन्म तमिळनाडूच्या इरोडमध्ये एका तमिळ ब्राह्मण अयंगर कुटुंबात झाला होता. त्यांनी 1903 मध्ये कुंभकोणममधील सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये बिगर-गणिती विषयांमधील त्यांच्या दुर्लक्षामुळे ते परीक्षेत अयशस्वी ठरले. 1912 मध्ये त्यांनी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये क्लर्क म्हणून काम सुरु केले.  तेथे त्यांच्या अफाट ज्ञानाची जाणीव तेथील एका गणितज्ज्ञाला झाली. या गणित तज्ज्ञाने रामानुजन यांना Trinity College, Cambridge University ला जाण्यासाठी प्रोत्साहित केले. 

पहिले महायुद्ध सुरु होण्याच्या काही महिन्यापूर्वी रामानुजन ट्रिनिटी कॉलेजमध्ये आले. 1916 मध्ये त्यांनी बॅचलर ऑफ सायन्सची पदवी प्राप्त केली. 1917 साली ते लंडन मॅथेमॅटिकल सोसाईटीसाठी निवडले गेले. पुढील वर्षी त्यांना एलीप्टिक फंक्शन आणि संख्या सिद्धांतावरील संशोधनासाठी रॉयल सोसाईटीचा फेलो म्हणून निवडण्यात आले. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये ते ट्रिनिटी कॉलेजचे फेलो म्हणून निवडण्यात आलेले पहिले भारतीय ठरले. 

देशातील मुस्लिम मुलींना 'स्वच्छ भारत मोहिमे'नं मोठा दिलासा मिळाला :PM...

सुरुवातीला रामानुजन सर्वसामान्य मुलांसारखेच होते. वयाच्या 10 व्या वर्षी त्यांनी प्रायमरी परीक्षेत जिल्ह्यात टॉप केले. वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांनी 'अ सिनॉपसिस ऑफ एलिमेंट्री रिझल्ट्स अँड अप्लाईड मॅथेमॅटिक्स' या पुस्तकाचे पूर्णपणे अध्ययन केले होते. त्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशीपही मिळाली होती. 

रामानुजन यांना फक्त गणितात रुची होती. त्यांनी दुसऱ्या विषयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याचमुळे त्यांना सुरुवातीला सरकारी कॉलेज आणि नंतर यूनिव्हर्सिटी ऑफ मद्रासची स्कॉलरशीप गमवावी लागली. 1911 मध्ये इंडियन मॅथेमॅटिकल सोसाईटच्या जर्नलमध्ये त्यांचा 17 पानांचा एक पेपर पब्लिश झाला होता. यादरम्यान, रामानुजन जगप्रसिद्ध ब्रिटिश गणितज्ज्ञ जीएच हार्डी यांच्याविषयी जाणू लागले होते. 1913 साली त्यांनी आपले काही फॉर्म्युले पत्राद्वारे हार्डी यांच्याकडे पाठवले. सुरुवातीला त्यांनी हे पत्र हसण्यावर घेतलं, पण लवकरच त्यांना रामानुजन यांची प्रतिभा कळाली. 

हार्डी यांनी रामानुजन यांना आपल्याकडे कॅम्ब्रिज येथे बोलावलं. येथे येऊन रामानुजन यांनी 20 रिसर्च पेपर पब्लिश केले. 1918 साली त्यांना रॉयल सोसायटी ऑफ लंडनचा सदस्य बनवण्यात आलं. भारत गुलामीत असताना रामानुजन यांची सोसायटीचा सदस्य म्हणून निवड होणे मोठी बातमी होती. शिवाय रॉयल सोसायटीच्या इतिहासात रामानुजन यांच्या इतक्या कमी वयाचा कोणीही आजवर सदस्य झाला नव्हता. 

रामानुजन यांना ब्रिटनचे थंड वातावरण मानवले नाही. 1917 मध्ये त्यांना टीबी झाला. 1919 मध्ये त्यांनी प्रकृती फारच बिघडली. त्यामुळे ते भारतात परत आले. 26 एप्रिल 1920 साली वयाच्या 32 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजारी असतानाही त्यांनी आपलं गणितासंबंधी काम कधी सोडलं नाही. स्वप्नामध्ये मला थेरम दिसतात, असं रामानुजन म्हणायचे.  

आम्हाला वाचवा...आम्हाला वाचवा...पेटत्या कारमध्ये 5 जणांनी सोडले प्राण

रामानुजन यांनी अनेक थेरम तयार केले आहेत, ज्यातील अनेकांचे कोडे अजूनही सुटू शकलेले नाही. त्यांचे एक जूने रजिस्टर 1976 मध्ये ट्रिनीटी कॉलेजमध्ये मिळाले होते, ज्यात अनेक थेरम आणि फॉर्म्युले आहेत. या रजिस्टरला 'रामानुजनची नोट बुक' असं म्हटलं जातं. यातील अनेक थेरम सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. 

रामानुजन यांना देवावर अफाट विश्वास होता. जेव्हा त्यांना गणित फॉर्म्युल्यांच्या उत्पत्तीबाबत विचारले जात असे, तेव्हा ते म्हणत की देवी नामगिरीच्या कृपेने त्यांना हा फॉर्म्युला सुचला आहे. ज्यात अध्यात्माचा विचार नाही, अशा गणित सूत्रांना माझ्या लेखी काही महत्व नाही, असं ते म्हणायचे. 

रामानुजन यांची बायोग्राफी 'द मॅन हू न्‍यू इंफिनिटी' 1991 साली पब्लिश झाली होती. 2015 मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित 'The Man Who Knew Infinity' चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेता देव पटेल यांने रामानुजन यांचे पात्र साकारले आहे. रामानुजन आजही केवळ भारतीयच नाही तर परदेशी गणित तज्ज्ञांसाठी प्रेरणास्तोत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT