national mha decides to fill up 84405 existing vacancies in capfs by dec 2023 mos nityanand rai  
देश

Vacancies In CAPF : सशस्त्र दलात डिसेंबर 2023 पर्यंत 84,405 पदांची भरती

सकाळ डिजिटल टीम

Vacancies In CAPF : गृह राज्यमंत्री (MoS) नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत माहिती दिली की सरकारने डिसेंबर 2023 पर्यंत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये (CAPFs) विद्यमान 84,405 रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप खासदार अनिल अग्रवाल यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पुढे म्हणाले की, कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) ची 25,271 पदे भरण्यासाठी यापूर्वीच परीक्षा घेण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

संसदेत सरकारने माहिती दिली की, 6 केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये एकूण 84,405 पदे रिक्त आहेत, त्यापैकी केंद्रीय राखीव पोलिस दलात सर्वाधिक 29,985 पदे आहेत. बुधवारी सरकारकडून राज्यसभेत ही माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी देखील सांगितले की, सरकारने डिसेंबर 2023 पर्यंत CAPF मध्ये सध्याची रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यमंत्री उघड केलेल्या डेटानुसार, CAPF मध्ये एकूण 84,405 ज्यापैकी आसाम रायफल्स (9,659), सीमा सुरक्षा दल (19,254), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (10,918), केंद्रीय राखीव पोलीस दल (29,985), तिबेटी सीमा पोलीस(3,187) आणि आणि सशस्त्र सीमा बल (11,402) यांचा समावेश आहे

तथापि, आसाम रायफल्स, बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी आणि एसएसबी या दलांची एकत्रित मंजूर संख्या 10,05,779 आहे. राय पुढे म्हणाले की, सरकारने CAPF मधील रिक्त पदे वेगाने भरण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदासाठी वार्षिक भरतीची एक प्रक्रिया आहे, ज्यासाठी कर्मचारी निवड आयोग (SSC) सोबत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे.

राय म्हणाले की, कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), सब-इन्स्पेक्टर (GD) किंवा सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी) आणि असिस्टंट कमांडंट (जनरल ड्युटी) या पदांवर भरतीसाठी प्रत्येकी एक-एक नोडल दीर्घ काळासाठी समन्वय साधण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. ते म्हणाले की, सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्सना नॉन-जनरल ड्युटी कॅडरमधील रिक्त पदांवर कालबद्ध पद्धतीने भरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT