Navy Day sakal
देश

National Navy Day: देशाचे संरक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाचे काम चालते कसे?

सकाळ डिजिटल टीम

National Navy Day: भारतीय नौदल ही आपल्या देशाची खूप मोठी ताकद आहे. आधुनिक तंत्रज्ञान, जिगरबाज मनुष्यबळ आणि शौर्याचा इतिहास याच्या जोरावर या नौदलाने जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे काम समजून घ्यायचे झाल्यास खालील मुद्दे पुरेसे ठरतील.

नौसैनिक, अधिकारी अशा दोन पातळीवर नौदलात भरती होते. ‘एनडीए’ व ‘यूपीएससी’ची कंबाईन डिफेन्स आदी स्पर्धा परीक्षांमधून अधिकाऱ्यांची व नौसैनिक भरतीतून इतर मनुष्यबळ भरले जाते. यात असणारे निकष सोपे नसतात.

नौसैनिक म्हणून भरती झाल्यास प्रथम प्राथमिक प्रशिक्षणातून त्या सैनिकाचा विभाग ठरतो. यात तांत्रिक, प्रत्यक्ष युद्धनौकांवर काम करणारे, कम्युनिकेशन आदी विविध विभाग असतात. त्या त्या वर्गवारीनुसार त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते.

नौदलाची जहाजे चालवण्यासाठी वेगळ्या कौशल्यांची गरज असते. समुद्रात ठरलेले रस्ते नसतात. दिशा अक्षांश, रेखांशाच्या आधारे निश्‍चित करून जहाजांचा प्रवास ठरतो. यासाठीचे वेगळे प्रशिक्षण आणि त्या माध्यमातून उच्च कौशल्य असलेले मनुष्यबळ तयार केले जाते.

पाणबुडीमध्ये काम करण्याचे कौशल्य अवगत असणारे नौसैनिकही घडविले जातात. शिवाय अशा पाणबुडींशी संपर्क कसा करायचा, शत्रूच्या पाणबुड्या कशा शोधायच्या, त्यांना शह कसा द्यायचा, यासाठीचे पूर्ण कौशल्य आत्मसात केलेले केडरही नौदलात असते.

विविध शस्त्र चालवण्याचे विशेष कौशल्य नौसैनिकांकडे असते. कारण समुद्रात टार्गेट जमिनीप्रमाणे स्थिर नसते. त्यामुळे नौसेनेत शस्त्र प्रशिक्षण अधिक कठीण आणि कौशल्यपूर्ण असते.

जहाजावरून लढाऊ विमाने उडवणे, क्षेपणास्त्र डागणे, शत्रूच्या क्षेपणास्त्रांना शह देणे असे कितीतरी वैविध्यपूर्ण प्रशिक्षण येथे द्यावे लागते. जहाजांचे संचलन, शत्रूपासून उघड्या समुद्रात त्याचा बचाव, शत्रूच्या रडार यंत्रणेपासून लपण्यासह शत्रूच्या हालचाली टिपण्यापर्यंतच्या कितीतरी थरारक गोष्टी या नौदलाच्या विश्‍वात नेहमीच्या बनून जातात. समुद्रातील संवाद व्यवस्था हे आणखी एक कौशल्याचे क्षेत्र असते.

समुद्रात दीर्घकाळ राहणाऱ्या इतक्या यंत्रणेसाठी अन्नपुरवठा, दैनंदिन गरजा, पाणी व्यवस्था हे पाहणारीही आणखी एक सक्षम यंत्रणा नौदलात कार्यरत असते. नवे आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यातही नौदल आघाडीवर असते.

इतक्या सगळ्या गौष्टी ‘भारतीय नौदल,’ या दोन शब्दांत विसावलेल्या असतात. यामुळेच या दोन शब्दांची ताकद, सामर्थ्य भारतीय सागरी सीमांचे संरक्षण करण्यात सक्षम ठरते. आतापर्यंत भारतीय नौदलाने अनेकदा आणीबाणीच्या स्थितीत सामर्थ्याची प्रचिती दिली आहे.

शांततेच्या काळात समुद्रात आंतराष्ट्रीय सागरी क्षेत्रात सतत टेहाळणीची जबाबदारी नौदलावर असते. कच्छच्या रणापासून केरळपर्यंत पूर्ण किनाऱ्याचे संरक्षण नौदल करते. यात अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंद महासागर याचे क्षेत्र येते. नौदल युद्धासाठी कायम सज्ज असते.

आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत असणाऱ्या चाचेगिरीवर नौदल नियंत्रण ठेवते. भारतीय व्यापारी जहाजांसह इतर देशांच्या जहाजांनाही आणीबाणीच्या स्थितीत नौदल मदतीला धावते.

किनारपट्टीभागातील गुन्हेगारी कारवाया रोखण्यात कोस्टगार्ड, मरिन पोलिस यांना नौदलाची साथ असते.

नौदल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण विशाखापट्टणम, नौसैनिकांचे प्रशिक्षण लोणावळा, जामनगर, गोवा आदी ठिकाणी चालते. सिंधुदुर्ग, गोव्याजवळ कारवारमध्ये नौदलाचा मोठा प्रकल्प आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT