देश

Republic Day 2024 : प्रजासत्ताकदिनी स्त्री शक्तीचा जागर; 'परेड-परफॉर्मन्स'सह सर्व उपक्रमांमध्ये महिलांचाच सहभाग

संतोष कानडे

नवी दिल्लीः केंद्र सरकारने सैन्य आणि इतर क्षेत्रांमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाय राबविले आहेत. त्याच अनुषंगाने एक नवीन उपक्रम जाहीर करण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार २०२४च्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीत जे परेड, मार्च पास्ट आणि सादरीकरण होईल, त्यामध्ये पूर्णपणे महिलांचा सहभाग असेल. संरक्षण मंत्रालयाने यासंबंधीचे आदेश काढले आहेत.

संरक्षण मंत्रालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशामध्ये सर्व सुरक्षा यंत्रणा, इतर महत्त्वपूर्ण विभागांना आतापासूनच यासंबंधी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार तयारीला सुरुवात होत आहे.

प्रजासत्तादिनी परेडच्या वेळी मार्च आणि बँडची पथकं, सादरीकण आणि प्रदर्शनामध्ये महिलांचा सहभाग असणार आहे. गृह मंत्रालय, सांस्कृतिक आणि शहरी विकास मंत्रालय यासह इतर मंत्रालयांनाही संरक्षण मंत्रालयाने याबाबत अवगत केले आहे.

महिलांना प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे महिला वायू दलामध्ये फायटर पायलट पदापर्यंत पोहोचत आहेत. तसेच जवानांच्या रुपात महिला सहभागी होत आहेत, त्यातूनच लष्कराने महिला अधिकाऱ्यांसाठी आर्टिलरी रिजिमेंट सुरु केली आहे.

लष्कराच्या म्हणण्यानुसार, कर्नल गीता राणा ह्या चीनच्या सीमेला लागून असलेल्या संवेदनशील लडाख प्रदेशात स्वतंत्र युनिटचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी ठरल्या आहेत. याशिवाय पहिल्यांदाच लष्कराने महिला अधिकारी कॅप्टन शिवा चौहाण यांना जगातील सर्वात उंच आणि सर्वात थंड सियाचीनमध्ये तैनात केले आहे. लष्कराने सुदानमधील अबेई या विवादित प्रदेशात 27 महिला शांतीरक्षकांची सर्वात मोठी तुकडीही तैनात केली आहे.

एकूणच केंद्र सरकार महिला धोरण पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. मोदी सरकारच्या प्रजासत्तादिनाच्या उपक्रमामकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्या दिवशी सर्व उपक्रम महिला राबवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT