'मुस्लिम समाजानं बनवलेल्या वस्तू आणि त्यांच्या सर्व कामांवर बंदी घातली पाहिजे.'
Navratri 2022 : देशभरात नवरात्रोत्सव (Navratri Festival) अतिशय उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी माँ दुर्गेची मनोभावे पूजा-अर्चा करण्यात येत आहे. त्याचबरोबर गरबा कार्यक्रमाचं (Garba Program) देखील आयोजन करण्यात आलं आहे.
दरवर्षी लोक गरब्याची आतुरतेनं वाट पाहत असतात. मात्र, यावेळी मध्य प्रदेश सरकारनं (Madhya Pradesh Government) गरबा कार्यक्रमाबाबत कडक सूचना जारी केल्या आहेत. गरबा पंडालमध्ये प्रवेशापासून सुरक्षेपर्यंत जिल्हा प्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासोबतच राज्यातील भाजप नेतेही पंडाल प्रवेशाबाबत सातत्यानं वक्तव्ये करत आहेत.
भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (Bhopal MP Pragya Singh Thakur) यांनी गरबा पंडालच्या प्रवेशाबाबत मोठं वक्तव्य केलंय. ओळखपत्र तपासूनच गरबा पंडालमध्ये प्रवेश द्यावा, असं त्या म्हणाल्या आहेत. साध्वी प्रज्ञा पुढं म्हणाल्या, मुस्लिम समाजाच्या (Muslim Community) लोकांना पंडालमध्ये प्रवेश देऊ नये. आम्हाला आमची उपासना पद्धत शुद्ध ठेवायची आहे. कोणत्याही प्रकारे आमच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये मुस्लिम समाजानं बनवलेल्या वस्तू आणि त्यांच्या सर्व कामांवर बंदी घातली पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
यापूर्वी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही गरबा पंडालच्या प्रवेशाबाबत वक्तव्य केलं. माँ दुर्गेच्या उपासनेचा सण नवरात्री हे आपल्या श्रद्धेचं केंद्र असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं होतं. अशा पवित्र प्रसंगी शांतता आणि सौहार्दाचं वातावरण राहावं, यासाठी आयोजकांना ओळखपत्र पाहूनच गरबा कार्यक्रमात प्रवेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरबा पंडालमध्ये आधार कार्ड (Aadhar Card) पाहूनच प्रवेश द्यावा, असं मंत्री उषा ठाकूर यांनीही सांगितलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.