Navratri 2023 scenes from Menstrual Child Trafficking in Durgotsav in Bengal sakal
देश

Navratri 2023 : बंगालमधील दुर्गोत्सवात मासिक पाळीपासून मुलांच्या तस्करीच्या विषयांवर देखावे

समाजाचा मोठा सहभाग असलेल्या दुर्गा पूजेत सामाजिक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची संधी

श्‍यामल रॉय

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील दुर्गापूजा उत्सव हा सामाजिक अभिसरणासाठी पूरक ठरत आला आहे. समाजाचा मोठा सहभाग असलेल्या दुर्गा पूजेत सामाजिक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळते. यंदा उत्सवही त्याला अपवाद नाही. समाजात ज्यावर फारसे बोलले जात नाही अशा मासिक पाळीपासून सरोगेट माता, अॅसिड हल्ल्यांतील पीडित आणि मुलांची तस्करी आदी विषयांवर यंदा काही दुर्गापूजा समित्यांनी देखावे उभारले आहेत.

पाथुरियाघाट पंचरपल्ली सार्वजनिक दुर्गा उत्सव या मंडळाचे यंदा ८४ वे वर्ष आहे. मासिक पाळीवर आधारित ‘ऋतुमती’ या विषयावर मंडळ जनजागृती करणार आहे. मासिक पाळी सुरू असताना महिलांना दुर्गापूजेत सहभागी होण्यास २१ व्या शतकातही बंदी का घातली जाते?, असा प्रश्‍न मंडळाच्या प्रमुख एलोरा साहा यांनी उपस्थित करीत दुर्गापूजेत या संकल्पनेवर आधारित देखाव्याची माहिती दिली.

‘ऋतुमती’संदर्भात मांडवात चित्रकला, शिल्पकला आणि छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच भव्य बंगाली दिनदर्शिका प्रदर्शित करून त्यातील प्रत्येक महिन्यांचे चार दिवस लाल रंगात दाखविण्यात येणार आहेत. मासिक पाळीच्या कालावधीमुळे मंदिरात प्रवेश करण्यास मनाई आहे, अशी स्त्री दुर्गामातेच्या रूपात दाखवण्यात येणार आहे.

उत्तर कोलकतामधील श्‍यामबझार पल्ली संघ भाडोत्री मातृत्वावर (सरोगेट मदर) प्रकाश टाकणार आहे. भारतात अवैध असलेल्या सरोगसीचा कसा बाजार मांडण्यात आला आहे, याकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे मंडळाचे सचिव सुव्रत भट्टाचार्य यांनी सांगितले.

उत्तर कोलकता येथील काशी बोस लेन दुर्गा उत्सव पूजा समितीने यंदा ८६ व्या वर्षी ‘बाल तस्करी’वर हा विषय घेतला आहे. या देखाव्यामुळे समाजात ठळक संदेश जाईल, अशी अपेक्षा राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आणि या मंडळाच्या अध्यक्षा शशी पांजा यांनी व्यक्त केली.

बंगालमधील गरीब कुटुंबांतील मुलींना पैशाच्या लालसेने आणि चांगल्या आयुष्याच्या आमिषाने अनेकदा वेश्या व्यवसायात ढकलले जाते, ही सामाजिक दुष्टता आहे. याचे उच्चाटन होणे आवश्‍यक आहे, असे मत मंडळाचे सरचिटणीस सोमेन दत्ता यांनी व्यक्त केले.

‘मुलींना आदराने वागवा’

सोवाबाजार बारताळा सार्वजनिक दुर्गापूजा मंडळ ‘मुलगी वाचवा’ या विषयावर देखावा सादर करणार आहे. बालिकांना वाचविण्याबरोबरच जात, पंथ किंवा धर्माची पर्वा न करता त्यांची काळजी घ्यावी, असा संदेश हे मंडळ देणार आहे. मुलींबाबत भेदभाव दर्शविणाऱ्या कलाकृती मांडवात सादर करण्यात येणार आहे. समाजाकडून प्रत्येक मुलीची चांगली काळजी घेतली जावी आणि तिला आदर मिळायला हवा, असे या मंडळाचे सरचिटणीस सायन नंदी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT