अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. अरुणाचल प्रदेशच्या ६० आणि सिक्कीमच्या ३२ विधानसभा जागांचे निकाल येत आहेत आहेत.
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये १९ एप्रिलला मतदान झाले होते. अरुणाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. तर सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) यांच्यात लढत आहे. येथे भाजप आणि काँग्रेसही रिंगणात आहेत.
सिक्कीमच्या 32 विधानसभा जागांचे निकाल दुपारपर्यंत अपेक्षित आहेत. पण आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने 29 जागांवर आघाडी घेतली आहे. तर विरोधी पक्ष सिक्कीम डेमोक्रॅटीक पक्ष 1 जागेवरच आघाडीवर आहे.
सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखाली सध्या सत्तेत आहे. त्यांची थेट स्पर्धा सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटसोबत आहे. भाजप आणि काँग्रेसही येथे आहेत. त्यांची उपस्थिती नाममात्र आहे.
मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग (गोले), माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग (एसडीएफ), भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार बायचुंग भुतिया, प्रेमसिंग तमांग यांची पत्नी कृष्णा कुमारी राय, पवन कुमार चामलिंग यांचा धाकटा भाऊ रूप नारायण चामलिंग यंदाच्या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार होते.
यावेळी राज्यात 79.88 टक्के मतदान झाले, तर 2019 मध्ये 81.43 टक्के मतदान झाले होते.
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपने निवडणुकीपूर्वीच 10 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. तर 29 जागांवर ते आघाडीवर आहेत. नॅशनल पीपल्स पार्टी 8 जागांवर आघाडीवर आहे, तर अरुणाचल पीपल्स पार्टी 2 जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान अरुणाचल विधानसभेत बहुमताचा आकडा 60 पैकी 31 जागा आहे. भाजपने निवडणुकीपूर्वीच 10 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत.
यामध्ये विशेष बाब अशी की अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही येथे निवडणूक लढवत असून, त्यांचे 3 उमेदवार आघाडीवर आहेत.
दरम्यान राष्ट्रावादी काँग्रेस फुटल्यानंतर अरुणाचल प्रदेशातील अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णण घेतला होता.
शनिवार, १ जून रोजी मतदानाच्या सातव्या टप्प्यासह २०२४ लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून एक्झिट पोल जाहीर होऊ लागले. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
निकालापूर्वी विविध वृत्तवाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांनी आज संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केले. रिपब्लिक टीव्ही PMARK च्या मते, NDA ला 359 जागा मिळू शकतात, तर इंडिया आघाडीला 154 जागा मिळू शकतात, इतरांना 30 जागा मिळू शकतात.
तीन एक्झिट पोलमध्ये भाजपसह एनडीएला 400 किंवा त्याहून अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.