Parth Pawar sakal
देश

Parth Pawar : जम्मू काश्मीरमध्ये पार्थ पवार ‘राष्ट्रवादी’चे स्टार प्रचारक

राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी महाराष्ट्राबाहेर विधानसभा निवडणुका लढविण्याची तयारी करणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी २६ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह पार्थ पवार हे देखील स्टार प्रचारक म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये प्रचार करतील.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय पक्ष बनण्यासाठी महाराष्ट्राबाहेर विधानसभा निवडणुका लढविण्याची तयारी करणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी २६ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह पार्थ पवार हे देखील स्टार प्रचारक म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये प्रचार करतील.

केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर विधानसभेच्या ९० जागांसाठी तीन टप्प्यात निवडणूक आहे. जम्मू काश्मीरमध्ये जवळपास २५ जागा लढण्याचे नियोजनही राष्ट्रवादी कॉँग्रेसने केले आहे. त्यापार्श्वभूमीवर पक्षाचे सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी २६ स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला काल (ता. २२) सादर केली.

यामध्ये पक्षाध्यक्ष अजित पवार, कार्यकारी अध्यक्ष व राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, केंद्रीय सरचिटणीस आणि प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, राज्यातील मंत्री छगन भुजबळ, सरचिटणीस एस. आर. कोहली, जम्मू काश्मीरचे प्रभारी ब्रीजमोहन श्रीवास्तव, कार्यसमितीचे सदस्य पार्थ पवार, ओबीसी सेलचे प्रमुख उमाशंकर यादव बहुतांश जम्मू काश्मीरमधील स्थानिक नेत्यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT