जयपूर : राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल (NCP Leader Praful Patel) यांचा मुलगा प्रजयचं लग्न जयपूरमधील रामबाग पॅलेसमध्ये (Praful Patel Son Wedding) थाटामाटात पार पडला. यानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी प्रफुल्ल पटेलांनी अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan), अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) आणि अभिनेता अनिल कपूरसोबत (Actor Anil Kapoor) ''जुम्मे की रात'' या गाण्यावर ठेका धरला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे.
प्रफुल्ल पटेल यांचा मुलगा प्रजय पटेल याचं मुंबईतील व्यावसायिक शिरीष पुंगिलिया यांची मुलगी शिविका हिच्यासोबत १८ डिसेंबरला लग्न पार पडलं. शिरीष हे मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांनी जयपूरच्या रामबाग पॅलेसमध्ये लग्नाचं आयोजन केलं होतं. १८ आणि १९ डिसेंबर असे दोन दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन कऱण्यात आलं आहे. यावेळी उद्योगपती सज्जन जिंदल, अदानी उद्योग समुहाचे गौतम अदानी, अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी, भारती एअरटेलचे सुनील भारती, हिंदुजा समुहाचे श्रीचंद हिंदुजा आदी मोठ्या उद्योगपतींनी हजेरी लावली. वेदांत रिसोर्सेस लिमिटेडचे अनिल अग्रवाल, क्रिकेटर रवी शास्त्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यासारख्या राजकीय नेत्यांनी देखील लग्नाला उपस्थिती दर्शवली.
देशातील राजकीय मंडळींचीही उपस्थिती -
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, प्रफुल पटेल यांचे बंधू अमरिश पटेल, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला, डॉ. केतन देसाई, भाजप नेते राजीव प्रताप रुडी आदी नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली होती.
मुलीच्या लग्नातही दिग्गजांनी लावली होती हजेरी -
प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेलचे लग्न २०१८मध्ये उद्योगपती नामित सोनी यांच्यासोबत झाले. तिच्या लग्नाच्या रिसेप्शनला भारतीय क्रिकेटर आणि बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री नुसरत भरुचा, धोनी,जहीर खान, युवराज सिंह, सोनाक्षी सिंहा, कतरिना कैफ, शाहरुख खानही उपस्थित होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.