Ramraje Naik Nimbalkar vs Ranjitsinh Naik Nimbalkar esakal
देश

Political News : ..तोवर कुणाच्या बापाची हिंमत होणार नाही; NCP च्या बड्या नेत्याचं BJP खासदाराला ओपन चॅलेंज

कितीही नेते आणुद्या इथं राज्य फक्त फलटणच्या श्रीरामाचंच राहणार बाकी कुणाच इथं चालू शकणार नाही, असं रामराजेंनी म्हटलं.

सकाळ डिजिटल टीम

फलटण शहर (सातारा) : दिल्लीत व मुंबईत सत्तांतर झालं म्हणून फलटणमध्ये कुणी सत्तांतराची स्वप्नं बघू नयेत. जोवर जनता आमच्या पाठीशी आहे, तोवर कुणाच्या बापाची हिंमत होणार नाही, की इथं सत्तांतर होईल, असा इशाराच आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजप (BJP) खासदाराला दिला आहे.

कोणाला कुणाची कितीही नावं घेऊ द्या, कितीही नेते आणुद्या इथं राज्य फक्त फलटणच्या श्रीरामाचंच राहणार बाकी कुणाच इथं चालू शकणार नाही, असंही रामराजेंनी (Ramraje Naik Nimbalkar) म्हटलंय. येथील शुक्रवार पेठ येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात रामराजे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक, शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, ‘‘खासदारकीच्या माध्यमातून त्यांना मोठी संधी मिळाली होती. फलटण शहर व तालुक्याचे त्यांनी सोने करायला हवे होते; परंतु बोलण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही व करूही शकत नाहीत. आता निवडणुकाजवळ आल्यात त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने सगळे जण खच्चून ओरडू लागले आहेत. ते माझ्या दृष्टीने क्षुद्र आहेत. त्यांच्यामध्ये क्षमता नाही. त्यांच्या मतदारसंघात त्यांच्याबद्दल लोक काय बोलतात हे आपणास चांगले माहिती आहे. त्यामुळे दांडगी हौस, राक्षसी महत्त्वाकांक्षा व काम करण्याची ताकद व इच्छा नसणाऱ्यांसोबत जाऊन जनतेला चालणार नाही.’’

नीरा-देवघर प्रकल्पाबाबत (Nira-Deoghar Project) ते म्हणाले, ‘‘या प्रकल्पाचे आपणच सगळे केले आहे. मीच त्याचे भूमिपूजन केले, टेंडर काढले, ६६ किलोमीटर पाणी आणले. आता कालवे काढायला जमिनीच्या किमती वाढल्याने पाइपलाइनद्वारे पाणी नेण्यात येणार आहे. त्याचे टेंडरही झाले असेल. महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील असतानाच हा निर्णय झाला आहे. कष्ट माझे आणि आयत्या पिठावर यांच्या रेघोट्या आहेत.’’

फलटणची संस्कृती वेगळी आहे. येथे जातीय, धार्मिक तेढ नाही. फलटण शहर आधुनिक शहर बनविण्यासाठी तुमची ताकद पाठीशी राहणे आवश्यक आहे. माझ्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त जनतेने नगरपालिका व तालुक्यात ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही रामराजे यांनी केले. कार्यक्रमापूर्वी शंकर मार्केट येथून ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीने व फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यक्रम स्थळी आमदार रामराजे यांचे आगमन झाले. यानंतर येथील ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT