supriya sule modi  sakal
देश

MPs Suspended : 'या' चार विधेयकांवर चर्चा नको होती म्हणून...; सुप्रिया सुळेंनी सांगितलं निलंबनामागचं कारण

रोहित कणसे

संसदेचं हिवाळी अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांवर गाजताना दिसत आहे. काल काही खासदारांचे निलंबन झाल्यानंतर आज पुन्हा ४९ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसांत जवळपास १४१ खासदारांचं निलंबन झालं आहे. संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी या खासदारांचं निलंबन करण्यात येत असून आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा समावेशे आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या निलंबनानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. शेतकरी,बेरोजगार, महिला-मध्यमवर्गीयांचे प्रश्न मांडले तर ते सभागृहातून बाहेर काढतात, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे. तसेच ही अघोषित आणिबाणी असल्याचे देखील सुळे म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात?

दुष्काळ आणि सरकारच्या धोरणांमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कांदा-कापूस-सोयाबीन-दूधाच्या दरांचा प्रश्न सरकारला विचारायचा नाही तर कुणाला विचारायचा? शेतकऱ्यांचं म्हणणं जर सरकारपर्यंत मांडायचंच नसेल, बेरोजगारांची घुसमट सरकारला ऐकायचीच नसेल, महिला-मध्यमवर्गीयांचे प्रश्न या सरकारला ऐकायचेच नसतील तर ते मांडायचेच नाहीत का? आणि जर हे प्रश्न मांडले तर ते सभागृहातून बाहेर काढतात.

संसदेच्या सुरक्षेत नेमकी काय चूक झाली याबद्दल प्रश्न विचारणे भाजपाच्या राज्यामध्ये गुन्हा आहे का ? हा प्रश्न विचारणाऱ्या १४१ खासदारांना माननीय लोकसभा अध्यक्षांनी निलंबित केले आहे. भाजपा सरकारने आज माझ्यासह आणखी ४९ खासदारांना संसदेतून निलंबित केले. सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहे हे स्पष्ट आहे. तसेच काही महत्वाच्या विधेयकांना चर्चेविनाच मंजूर करण्याचा भाजपाचा डाव आहे.

या दोन तीन दिवसांत

१. वृत्तपत्रस्वातंत्र्याचा संकोच करणारे प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरीऑडिकल्स बिल २०२३

२. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर कठोर प्रहार करणारे आणि निवडणूक आयोगाला केंद्र सरकारच्या हातचे बाहुले बनविणारे चीफ इलेक्शन कमिश्नर अँड अदर इलेक्शन कमिश्नर बिल २०२३

३. केंद्र सरकारला टेलिकॉम सर्विसेसमध्ये घुसखोरी करण्याचे आणि सुरक्षेच्या नावाखाली कुणाचेही फोन टॅप करण्याचे अधिकार देणारे टेलिकम्युनिकेशन बिल २०२३

४. पोलीसांना अमर्याद अधिकार देऊन नागरिकांच्या अधिकारांचा संकोच करणारी क्रिमिनल लॉ अमेंडमेंट

ही चार महत्वाची विधेयके चर्चेला येणार होती. परंतु सरकारमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची हिंमत नाही. त्यांनी त्यांना सभागृहातूनच निलंबित करण्याचा सोपा मार्ग निवडला. म्हणजे ही अघोषित आणिबाणी आहे. जनतेचा आवाज दडपाण्याचे पाप हे सरकार करतंय आणि म्हणूनच आम्ही सर्वजण या दडपशाहीच्या विरोधात ठामपणे एकजूटीने उभे आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT