sharad pawar nitin gadkari 
देश

शरद पवार-नितीन गडकरींची दिल्लीत भेट!

सुरज यादव

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज विरोधकांच्या गोंधळामुळे सतत स्थगित होत आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांकडून पेगॅसस प्रकरणाच्या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न विचारले जात आहेत

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज विरोधकांच्या गोंधळामुळे सतत स्थगित होत आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांकडून पेगॅसस प्रकरणाच्या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, याआधी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. सहकार क्षेत्रातील प्रश्नांशी संबंधित यावेळी चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. यानंतर आता शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाल्याचं म्हटलं जात आहे. (NCP sharad pawar bjp nitin gadkari meet in delhi parliament session 2021)

शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यातील ही भेट पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या सांगण्यावरून झाल्याचंही वृत्त आहे. या भेटीमागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही नेत्यांमध्ये संसदेत सुरु असलेल्या गोंधळाबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. गोंधळामुळे कामकाजात व्यत्यय येत असून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरील चर्चा झाली नसल्याबद्दल याआधी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरच यातून मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांची भेट गडकरींनी घेतली असल्याचं समजते. पावसाळी अधिवेश सुरु होऊन एक आठवड्याहून अधिक काळ झाला आहे.

विरोधकांचा गदारोळ

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पेगासस हेरगिरी प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळामुळे प्रश्नोत्तर, शून्य प्रहराच्या तासाबरोबरच इतर कामकाजही स्थगित झाले. पेगासस आणि कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झालेत. दररोज याच मुद्द्यावरुन संसदेत गोंधळ घातला जात आहे. त्यामुळे अनेकवेळा अधिवेशन स्थगित करण्यात आले.

आजचं अधिवेशन

कोरोना महामारीवर आज लोकसभेत चर्चा होणार होती. लोकसभा कामकाज समितीच्या सुधारित अजेंड्यानुसार, एनके प्रेमचंद्रन आणि विनायक राऊत शुक्रवारी देशातील कोविड -19 च्या परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करणार होते. पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यसभेत याविषयी आधीच चर्चा झाली आहे. पण, विरोधकांनी आजही गोंधळाचा सुर कायम ठेवला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT