Sharad Pawar Party New Symbol 'Tutari' 
देश

'Turha' Sharad Pawar Party New Symbol: शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह; निवडणूक आयोगाची घोषणा

Sharad Pawar Party New Symbol marthi news : सुप्रीम कोर्टानं नुकतीच शरद पवारांच्या पक्षाला लवकरात लवकर चिन्ह देण्याचे निर्देश दिले होते.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Sharad Pawar Party New Symbol : शरद पवार यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगानं 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केलं आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आली. (ncp sharad pawar group got new election symbol trumpet election commission announcement)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १५ फेब्रुवारी दिलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केलं. यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून पक्षाच्या नाव्या नावाचे आणि चिन्हाचे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडं सादर करण्यात आले होते. त्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार हे नाव काही दिवसांपूर्वीच आयोगानं दिलं. पण चिन्ह बहालं केलं नव्हतं. (Latest Marathi News)

दरम्यान, नार्वेकरांच्या निकालाविरोधात शरद पवार गटाकडून दाखल याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टानं शरद पवारांच्या पक्षाचं सध्याचं नाव येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काम ठेवतानाच लवकरात लवकर चिन्ह देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार, गुरुवारी रात्री उशीरा निवडणूक आयोगानं पवारांच्या गटाकडून दिलेल्या पर्यायांचा विचार करता 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहाल केलं. (Marathi Tajya Batmya)

'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकणार

शरद पवारांच्या पक्षानं ट्विटमध्ये म्हटलं की, "एक तुतारी द्या मज आणुनि फुंकिन मी जी स्वप्राणाने भेदुनि टाकिन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मजलागुनी!" “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'साठी गौरवास्पद बाब आहे.

महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी,शरद पवारांच्या साथीनं दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

Amit Shah: “तुमच्या चार पिढ्या आल्या तरी पुन्हा कलम 370 आणू शकणार नाहीत”; अमित शहांनी राहुल गांधींना सुनावलं

Latest Maharashtra News Updates : धुळे जिल्ह्यात सव्वा दोन एकरात गांजाची शेती; सुमारे ६ कोटींचं पीक उध्वस्त

KL Rahul - आथिया शेट्टी होणार आई-बाबा! सोशल मीडियावरून केली घोषणा

TET Exam : आता ‘टीईटी’ परीक्षेवर राहणार ‘एआय’ची नजर...!! परीक्षार्थींची फ्रिस्किंग आणि बायोमेट्रिक हजेरी होणार

SCROLL FOR NEXT