sharad pawar 
देश

Sharad Pawar : ''जरांगेंबद्दल माहिती नाही, पण सरकारमध्ये नाराजी होती'', शरद पवारांनी सांगितलं विजयाचं कारण

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून भाजपला बहुमत मिळालं नसलं तरी एनडीए सरकार स्थापनेच्या स्थितीत आहेत. दुसरीकडे, इंडिया आघाडीला गेल्या वेळेपेक्षा चांगली मतं मिळाली आहेत. जागांचं योग्य नियोजन केल्यास इंडिया आघाडीला देखील सत्ता स्थापनेची संधी आहे. शरद पवार हे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना सध्याच्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केलंय.

आमचं सरकार बनवण्यासाठी कोणासोबत बोलण झालेलं नाही. राज्यातील आमच्या पक्षांचा चांगला विजय झाला आहे. पुढची रणनीती ठरवण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. नितीश कुमार यांच्याबाबत मला माहिती नाही. NDA सोबत मी राहणार असं नितीश कुमार यांचं स्टेटमेंट मी वाचलंय, असं पवार म्हणाले.

लोकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्याबाबत नाराजी होती. तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात बरोजगारी वाढली होती. शिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित होते, त्यामुळे राज्यात भाजपला अपयश आलं आहे, असं शरद पवार म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा झाला याबाबत मला माहिती नाही अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

आमच्या बैठकीत जी रणनीती ठरेल त्यातून आम्ही पुढे जाऊ. मी कोणाशीही बोललो नाही. अजित पवार यांच्याबद्दल मला माहित नाही. निकालानंतर आमची पहिली मीटिंग आहे. यात रणनीती ठरवली जाईल. जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत चर्चा करणं योग्य नाही. उद्धव ठाकरे आज बैठकीला येत आहेत. उत्तर प्रदेशातील स्थितीबाबत मला माहिती नाही. पण महाराष्ट्रातील लोकांमधे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाराजी होती, त्याची ही रिअँक्शन आहे असं मला वाटतं, असंही ते म्हणाले.

इंडिया आघाडीच्या बैठकीला कोण-कोण येणार आहे याची माहिती नाही. पण, पुढील रणनीती काय असेल हे बैठकीमध्ये ठरवण्यात येईल. त्यानंतर आज रात्री याबाबत माहिती दिली जाईल, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT