Sharad Pawar 
देश

NCP Meeting: शरद पवारांची अध्यक्षपदी निवड; तटकरे, पटेल, कोहली निलंबित

दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार, शरद पवारांची लोकशाही पद्धतीनं निवड करण्यात आली आहे. तसेच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल तसेच कोहली या तीन खासदारांसह ९ आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. (NCP Working Commitee Meeting Sharad Pawar elected as President Suneel Tatkare Prafull Patel Kohli suspended)

राष्ट्रवादीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ८ ठरावांना मान्यता देण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यकारिणीनं शरद पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि केरळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष पीसी चाको यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएत सामिल झालेल्या महाराष्ट्रातील ९ आमदारांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

दरम्यान, पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, "आजची बैठक आमचं मनोधैर्य उंचावणारी होती. मीच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. मी सध्या कार्यरत आहे जरी माझं वय ८२ असेल किंवा ९२ असेल. यापुढं आमचं जे काही म्हणणं असेल ते आम्ही निवडणूक आयोगापुढं मांडणार आहोत" (Marathi Tajya Batmya)

फक्त आमदार हेच पक्ष, हा निकष नाही

पवार पुढे म्हणाले, अजित पवारांनी आपणच अध्यक्ष असल्याचा जो दावा केला आहे. मला त्याबद्दल माहीत नाही, मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. त्यांच्या दाव्यात काही तथ्य नाही, सत्यता नाही. त्यांनी बैठकीबाबत जे म्हटलं आहे त्यात काही तथ्य नाही.

सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी निर्णय देताना फक्त आमदार हेच पक्ष ठरवण्याचे निकष नाहीत, असं म्हटलं आहे. कोणाला काय बनायचं आहे, यावर मी बोलणार नाही. कोणाला पंतप्रधान बनायचंय कोणाला उपपंतप्रधान व्हायचं असेल. आमच्यासोबत कोणते आमदार आहेत हे लवकरच समजेल, असंही पवार यावेळी म्हणाले. ईडी, सीबीयचा वापर भाजपकडून पक्ष फोडण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT