jp nadda bjp esakal
देश

Opposition Meeting : एकीकडे विरोधकांची एकजूट तर दुसरीकडे 38 पक्ष सोबत असल्याचा भाजपचा दावा; उद्या बोलावली बैठक

संतोष कानडे

नवी दिल्लीः देशातले विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. पाटण्याच्या बैठकीनंतर आज आणि उद्या बंगळूरुमध्ये बैठक बोलावण्यात आलीय. त्यातच भाजपनेदेखील उद्या एनडीएची बैठक बोलावली आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची बैठक उद्या बोलावण्यात आलेली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितलं की, उद्याच्या बैठकीमध्ये ३८ पक्ष सहभागी होणार आहेत. आमचं संघटन हे देशहितासाठी असून विरोधक मात्र स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत. त्यांच्याकडे ना नेता आहे, ना नीती आहे, ना निर्णय घेण्याची क्षमता आहे.

उद्याच्या एनडीएच्या बैठकीपूर्वी जेपी नड्डा यांनी भाजप मुख्यालयातून माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, आज 'एनडीए'कडे लोक आकर्षित होत आहेत. हे एक आदर्श संघटन आहे. कारण आम्ही सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी पुढे आलेलो आहोत. भारताला मजबूत बनवण्यासाठी आम्ही काम करत असल्याचं नड्डा म्हणाले.

बंगळूरु येथे २६ विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधात रणनिती आखत आहेत. तेव्हाच भाजपनेही एनडीएच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. नड्डा म्हणाले की, नऊ वर्षांमध्ये एनडीएचा ग्राफ आणि स्कोप वाढला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये चांगलं सरकार देण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT