सत्ताधारी भाजप 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे.
काश्मिरी पंडितांच्या (KashmirI Pandit) बाबतीत जे घडलं, त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देशभरात 'दोन मुलं' धोरण (Two Children Policy) लागू केलं पाहिजे. सध्या देशात दोन अपत्य धोरण लागू करण्याची वेळ आलीय. जर हे धोरण लागू केलं नाही, तर 30 वर्षांनंतर संपूर्ण देशभरात 'फायली' तयार करण्याची वेळ येईल. भरूच फाइल्स, वडोदरा फाइल्स, भारत फाइल्स अशा कितीतरी फायली कराव्या लागतील, असं स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया (Pravin Togadia) यांनी व्यक्त केलं.
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे (International Hindu Parishad) अध्यक्ष तोगडिया यांनी दावा केलाय की, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (BJP) 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, भाजप आतापर्यंत काश्मिरी पंडितांचं का पुनर्वसन करू शकली नाही, याचं उत्तर त्यांनी द्यावं, असं थेट आव्हान त्यांनी केलंय.
भरुचमधील कार्यक्रमात तोगडिया पुढे म्हणाले, काश्मिरातून सुमारे चार लाख हिंदूंवर हल्ले करून त्यांना बेघर करण्यात आलं; पण हे इतिहासाचं अर्ध सत्य आहे. यात आणखी एक सत्य आहे. काश्मीरमधील 30 वर्षांपैकी केवळ 15 वर्षे काँग्रेसचं सरकार (Congress Government) होतं, तर उर्वरित वर्षे भारतीय जनता पक्षाचं राज्य होतं. यावेळी प्रथम अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) आणि नंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सरकारचं नेतृत्व केलं. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही हिंदूंचं का पुनर्वसन करु शकलं नाही?, असा थेट सवाल त्यांनी भाजपला केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.