NEET and UGC Net Students sakal
देश

NEET Exam : ‘नीट’ प्रकरणी ‘सीबीआय’कडून पाटण्यात चौकशी

नीटमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने रविवारी एफआयआर दाखल केला.

पीटीआय

पाटणा - वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेतील (नीट) कथित गैरप्रकाराच्या तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे पथक(सीबीआय) बिहारची राजधानी पाटणा येथील पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाच्या (ईओयू) कार्यालयात दाखल झाले. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे विभागाच्या वतीने केला जात होता.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे देण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्यानंतर या प्रकरणी गोळा करण्यात आलेले पुरावे तपासण्यासाठी सीबीआयचे पथक आर्थिक गुन्हेविभागाच्या कार्यालयात दाखल झाले आहे. आर्थिक गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

नीटमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने रविवारी एफआयआर दाखल केला. त्याचप्रमाणे सीबीआयचे पथक, या प्रकरणी अटक केलेल्यांना चौकशीसाठी पाटणा येथून दिल्लीला नेण्याची शक्यताही आहे.

नीट परिक्षेत गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींवर पुरावे नष्ट केल्याप्रकरणीही सीबीआयच्या वतीने एफआयआर दाखल होणार असून, या प्रकरणात दोषी आढळलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी तपास करण्यात येणार असून त्याबाबतही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि दानापूर नगरपरिषदेतील कनिष्ठ अभियंता सिकंदर प्रसाद यादव याने बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप असून त्याची पार्श्‍वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे.

केंद्र सरकार व ‘एनटीए’ला बाजू मांडण्याचे आदेश

जयपूर - ‘नीट’ रद्द करण्याबाबतच्या याचिकेप्रकरणी केंद्र सरकार व‘एनटीए’ने बाजू मांडावी असे आदेश सोमवारी राजस्थान उच्च न्यायालयाने दिले. ‘नीट’ परीक्षेत गैरप्रकार झाला असून परीक्षा रद्द करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले.

या प्रकरणाची पुढील सुनावणी दहा जुलै रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातही याबाबत याचिका दाखल करण्यात आल्या असून परीक्षा रद्द करण्यासह यातील गैरव्यवहाराची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

‘नीट’च्या पेपरफुटीत सोलापूर झेडपी शाळेतील शिक्षक

सोलापूर - ‘नीट’ पेपरफुटीतील मुख्य संशयित संजय तुकाराम जाधव (रा. बोथी तांडा, ता. चाकूर) सोलापूर झेडपीच्या माढा तालुक्यातील टाकळी टे. येथील वस्ती शाळेवरील शिक्षक असल्याची बाब उघड झाली आहे. त्याचे अनेक कारनामे समोर येत आहेत.

लातूरला क्लास घ्यायला सहजपणे जाता यावे, म्हणून आंतरजिल्हा बदलीनंतर त्याने वस्ती शाळेची आवर्जून निवड केली. त्याठिकाणी दरमहा १० हजार देऊन डमी शिक्षक नेमला. पत्नीच्या आंतरजिल्हा बदलीसाठी ‘संवर्ग-१’चा गैरफायदा घेऊन पत्नी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र देऊन पत्नीचीही सोलापूर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदली करून घेतली, या संशयित बाबींचीही आता चौकशी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT