Neet Exam Result sakal
देश

Neet Exam Result : शहर आणि केंद्रनिहाय ‘नीट’चा निकाल जाहीर

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर आज ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (एनटीए) वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेचा (नीट-यूजी) शहर व केंद्रनिहाय निकाल जाहीर केला आहे. ‘एनटीए’च्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर आज ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (एनटीए) वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेचा (नीट-यूजी) शहर व केंद्रनिहाय निकाल जाहीर केला आहे. ‘एनटीए’च्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध झाला आहे.

हा निकाल विद्यार्थ्यांना www.exams.nta.ac.in या संकेतस्थळावर पाहता येईल. हा निकाल पाहण्यासाठी परीक्षा केंद्राचा कोड क्रमांक आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या १८ जुलैला झालेल्या सुनावणीदरम्यान ‘एनटीए’ला नीटचा शहर व केंद्रनिहाय निकाल जाहीर करावे, असे निर्देश दिले होते. हा निकाल जाहीर करताना विद्यार्थ्यांची ओळख लपवून ठेवावी असेही निर्देश देण्यात आले होते. परंतु बहुसंख्य विद्यार्थ्यांना शहर व केंद्रनिहाय निकालाची पडताळणी कशी करायची? याबद्दलची माहिती नसल्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांचा संभ्रम कायम आहे. नव्याने जारी करण्यात आलेल्या निकालानुसार गुजरातमधील वादग्रस्त गोध्रा येथील जय जलाराम स्कूल सेंटरवरून एकही उमेदवार टॉपर नसल्याची माहिती समोर आली आहे. पेपरफुटीप्रकरणी याच शाळेच्या मुख्याध्यापकांना अटक करण्यात आली होती. या सेंटरवरील दोन उमेदवारांना सहाशे गुण मिळाले होते.

कोड क्रमांक आवश्यक

केंद्र व शहरनिहाय निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळावर संबंधित शहराचा कोड क्रमांक टाकणे आवश्यक आहे. ‘नीट’च्या परीक्षेमध्ये वादग्रस्त ठरलेले शहर व परीक्षा केंद्रातील विद्यार्थी आणि इतर शहरांतील परीक्षा केंद्रांवर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालाची पडताळणी करण्यासाठी हे निर्देश देण्यात आले होते. हे निकाल जाहीर करताना विद्यार्थ्यांची ओळख पटणार नाही याची काळजी घ्यावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले होते.

सोमवारी अंतिम निकाल

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय २२ जुलैलला (सोमवारी) अंतिम निकाल देणार आहे. यात ‘नीट’ परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेणे किंवा न्यायालयाच्या अखत्यारित या परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास करण्यासंदर्भात सूचना देणे याबाबत निर्णय होऊ शकतो. या सगळ्या गोंधळात संपूर्ण परीक्षेच्या पारदर्शकतेशी तडजोड झाल्याचे आढळून आले तरच पुन्हा परीक्षेचे निर्देश दिले जाऊ शकतात असे संकेत न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT