NEET Paper Leak  esakal
देश

NEET Paper Leak : NEET पेपर लीक प्रकरणात पाटणा AIIMS मधील संशयित विद्यार्थांना CBI ने घेतलं ताब्यात, चौकशी सुरू

CBI Research NEET Paper Leak : सीबीआय अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू पाहत होती ज्यांनी लिक झालेले नीटचे पेपर सोडवले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

 NEET Paper Leak :

नीट पेपर लीक प्रकरणात अनेक लोकांना आजपर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. अशा संशयित चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीबीआयकडून (CBI) त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यातून काही धागेदोरे मिळतील असा अंदाज सीबीआयला आहे.

पाटणातील एम्स कॉलेजमधील ज्या चार मेडिकल स्टुडंट्सना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे आता समोर आली आहेत. यामधील तीन विद्यार्थी 2021 च्या बॅचचे म्हणजे तिसऱ्या वर्षाचे असून चौथा विद्यार्थी 2022 च्या बॅचचा आहे. म्हणजे तो सध्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. या विद्यार्थ्यांचे हॉस्टेलमधील रूम्स सील करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांकडून मोबाईल लॅपटॉप हे सुद्धा जप्त करण्यात आले आहे.

या चार विद्यार्थ्यांची नावं पुढील प्रमाणे, चंदन कुमार, राहुल कुमार, करण जैन, हे सर्व तिसऱ्या वर्षात शिकतात आणि चौथा विद्यार्थी कुमार शानू हा दुसऱ्या वर्षात शिकत आहे.  यापैकी चंदन सिंह हा सिवान या गावी तर कुमार शानू पटणामध्येच राहतो. राहुल आनंद धनबाद येथील तर करण जैन अरिया इथला रहिवासी आहे.  

सीबीआयची टीम बुधवारी पाटणामधील एम्स कॉलेजवर पहिल्यांदाच पोहोचली. पहिल्यांदा आपल्या सोबत चंदन सिंहला नेले होते. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता कुमार शानू आणि राहुल आनंद यांना सीबीआयने सोबत कॉलेजवर नेले. यानंतर करण जैन या विद्यार्थ्यालाही सीबीआयने कॉलेजवर नेले.

सीबीआय अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू पाहत होती ज्यांनी लिक झालेले नीटचे पेपर सोडवले आहेत. एम्सने अशा विद्यार्थ्यांचा मागवा घेतला जे या परीक्षेत उच्चांकी मार्कांनी पास झाले आहेत. सीबीआय सुद्धा अशाच विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करत आहे. या विद्यार्थ्यांनी पेपर सोडवताना काय केलं, तो कसा सोडवला याची माहिती सीबीआय या विद्यार्थ्यांकडून मिळवत आहे.

सीबीआयला हे सुद्धा जाणून घ्यायचे आहे की, या विद्यार्थ्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे पेपर सोडवले आणि हे पेपर सोडवण्यासाठी अशा प्रकारची लाच त्यांना देण्यात आली. पैसे किंवा आणखी कशाचे अमिष त्यांना दाखवलं होतं का?

या सर्वाचीच माहिती या तपासातून मिळेल असे सीबीआयला वाटते. या विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांमधूनच नीट परीक्षेचा हा गोंधळ करणाऱ्यांना शोधण्यात यश येईल.

नीट परीक्षेचा पेपर फोडण्याबाबत पाटणातील एम्स कॉलेजचे नाव सतत पुढे येत आहे. त्यावर एम्स कॉलेजचे कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले आहे की, आमच्यासाठी ही खूप धक्कादायक गोष्ट आहे, की आमच्या कॉलेजचे विद्यार्थी या सगळ्यात समाविष्ट आहेत.

आम्ही सीबीआयच्या चौकशीची आणि तपासाची वाट पाहू. जर आमच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा त्याच्याशी संबंध असला तर कॉलेज प्रशासन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल असेही त्यांनी सांगितले.

या आधी सीबीआयने पंकज कुमार आणि राजू या दोन लोकांना अटक केली आहे. यातील पंकज वर असा आरोप आहे की त्याने ट्रक मधून क्वेश्चन पेपर चोरले होते. सीबीआयने या दोघांनाही रिमांडवर घेऊन चौकशी केली आहे.

आता सीबीआय समोर हा प्रश्न आहे की, हा ट्रक ज्या मार्गाने जाणार होता त्याची माहिती कशी फुटली, आणि ही माहिती या लोकांपर्यंत कशी पोहोचली याचा शोध सीबीआय घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT