NEET PG  sakal
देश

NEET PG : ‘नीट-पीजी’ परीक्षा अकरा ऑगस्टला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय वैद्यक शास्त्र परीक्षा मंडळाकडून (एनबीईएमएस) नीट - पीजी परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या ११ ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

‘नीट-यूजी’ परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून ‘नीट-पीजी’ परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. ‘नीट - पीजी’ची परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत घेतली जाईल. या परीक्षेची ‘कट ऑफ डेट’ १५ ऑगस्टला जाहीर केली जाईल, असे ‘एनबीईएमएस’ मार्फत सांगण्यात आले आहे.

परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या नीट - यूजी परीक्षेतील गैरप्रकार चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षेत अनियमितता उघडकीस आली होती. यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून २३ जून रोजी होणारी नीट - पीजी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidansabha: हरियाणा नंतर आता राष्ट्रीय पक्षांचे 'मिशन महाराष्ट्र'; पंतप्रधान मोदी, राहुल गांधी करणार दौरे

NA Tax : सोसायट्यांचा ‘एनए टॅक्स’ अखेर रद्द; दोन लाखांहून अधिक सोसायट्यांना दिलासा

Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी! संघ थेट प्रचारात उतरणार? ७० दिवसांचा मेगा प्लॅन रेडी; पण फायदा कुणाला?

Nitin Gadkari : 'झाले बहु, होतील बहु यासम हा' असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व; काय म्हणाले गडकरी?

ATC Raid : मालेगावसह मराठवाड्यात एटीएस, एनआयएची पहाटे छापेमारी; अनेक तरुणांना उचललं

SCROLL FOR NEXT